नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ अंतर्गत नवीन रेशन कार्ड तयार करण्यात येणार नाही, असे सांगितले आहे. तसेच तुमचे जुने रेशनकार्ड संपूर्ण देशात मान्य असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून रेशनकार्ड बद्दल सोशल मीडियावर अफवा पसरली असून त्यामुळे रामविलास पासवान यांनी त्यांच्या ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. ‘वन नेशन, वन रेशनकार्ड’ ही योजना १ जून २०२० पासून सुरु होणार असून या योजनेसाठी जुने रेशनकार्डही मान्य असेल. तर देशातील १२ राज्य आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थान, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, गोवा, झारखंड आणि त्रिपुरामध्ये एक राष्ट्र, एक रेशनकार्ड ही योजना सुरु झाली आहे.
एकीकडे सोशल मीडियावर रेशनकार्ड संबंधित काही अफवा पसरत असून यावरच पीआयबीच्या फॅक्ट चेकरकडून तुमचे जुनेच रेशनकार्ड ग्राह्य असल्याची माहिती मिळत आहे. या योजनेद्वारे कोणतेही नवे रेशनकार्ड जारी करण्यात येणार नसून नवे बनवून घेण्याची गरज नाही.
A #FakeNews is doing the rounds of Social Media that new ration cards will be issued for the One Nation One Ration Card Scheme#Reality: Old ration cards will remain valid throughout the nation. No new ration cards are being made for the One Nation One Ration Card Scheme!!! pic.twitter.com/Kiw0KeHNHY
— PIB Fact Check (@PIBFactCheck) February 5, 2020
रामविलास पासवान यांनी ट्विट केले की देशात नवे रेशन कार्ड तयार करण्याचे खोटे सूचना पत्र फिरत असून याप्रकरणी एफआयआर जारी केली जात आहे. तसेच देशात एक देश, एक रेशनकार्ड योजना लागू झाल्यावर कार्डधारक राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कोणत्याही राज्यातून रेशनच्या दुकानातून आपले रेशन घेऊ शकता.
देशभर में नये राशनकार्ड बनाने के लिए एक फर्जी पत्र जारी हुआ है जो संलग्न है। इसे गंभीरता से लेते हुए FIR दर्ज करवाया जा रहा है। मैं स्पष्ट कर रहा हूं कि वन नेशन-वन राशनकार्ड के तहत कोई नया राशनकार्ड नहीं बन रहा।किसी झांसे में न आएं। आपका पुराना राशनकार्ड ही पूरे देश में मान्य है। pic.twitter.com/X8ezOMe1Qj
— Ram Vilas Paswan (@irvpaswan) February 4, 2020