Omicron Restrictions Maharashtra | राज्यात पुन्हा निर्बंध ! ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेऊन आज नवीन नियमावली जाहीर होणार

Omicron restrictions maharashtra omicron restrictions maharashtra again new regulations will be announced today.

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Omicron Restrictions Maharashtra |
राज्यातल्या कोविड (Covid-19) रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर काल टास्क फोर्स (Maharashtra Covid Task Force)  सदस्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मार्गदर्शन केले. आगामी नाताळ, नववर्ष स्वागत असे प्रसंग लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीने विस्तृत चर्चा करण्यात येऊन याबाबत आज (दि. 24) नवी नियमावली जाहीर करण्याचे ठरले आहे. (Omicron Restrictions Maharashtra).

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

दि. 23 डिसेंबर रोजी (काल) दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत इतर राज्यांनी लावलेल्या निर्बंधांवर (Omicron Restrictions Maharashtra) तसेच युरोप, अमेरिकेत कोरोनाची वाढत्या संख्येवर चर्चा करण्यात आली. मुख्य सचिव देवशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार डॉ दीपक म्हैसेकर, BMC आयुक्त इकबालसिंह चहल, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, टास्क फोर्सचे डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी, डॉ अजित देसाई, डॉ राहुल पंडित आदींनी सहभाग घेतला व सूचना केल्या आहेत. आज (दि. 24) नवी नियमावली जाहीर होणार आहे.

web title : Omicron restrictions maharashtra omicron restrictions maharashtra again new regulations will be announced today.

Pune Crime | ‘चाकण’च्या हद्दीत भर चौकात कुस्ती तालीम चालवणारे पैलवान नागेश कराळे यांची गोळ्या झाडून हत्या; पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये प्रचंड खळबळ

Pune Crime | अल्पवयीन मुलावरील अनैसर्गिक अत्याचाराचा उलगडा; मोबाईलमधील अश्लील क्लिपनं गुन्ह्याची उकल, पुण्यातील घटना

Pune Crime | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला सिंहगड रोड पोलिसांकडून अटक; 1 पिस्टल 2 काडतुस जप्त

Food and Drug Administration Pune | …म्हणून पुण्यात वडापाव, पोहे किंवा अन्य खाद्यपदार्थ पेपरमध्ये गुंडाळून मिळणार नाही