पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – Omicron Covid Variant in Pune | मागील काही दिवसांत पिंपरी चिंचवड परिसरात एकूण 6 ओमायक्रॉन बाधित आढळुन (Omicron Covid Variant in Pune) आले होते. त्यातील 4 रुग्ण बरे झाले असल्याची माहिती सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. दरम्यान, पिंपरीत (Pimpri) आणखी नवे चार ओमायक्रॉन व्हेरिंएट बाधित (4 omicron variants) सापडले असल्याची माहिती समोर आली आहे. 4 जणांना ओमायक्रॉनची लागण झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून (Municipal Health Department) देण्यात आली आहे.
नायजेरीयातून लेगॉस शहरातून आपल्या भारतीय वंशाची 44 वर्षीय महिला आपल्या भावाला भेटण्यासाठी आली होती. तिच्या सोबत तीच्या 2 मुली आल्या होत्या. त्यातील या तिघींच्या संपर्कात आलेल्या 13 जणांची तपासणी केली होती. त्यात महिलेचा 45 वर्षीय भाऊ, त्यांची दीड वर्षे, 7 वर्षांची दोन मुली अशा 6 जणांना ओमायक्रॉनची बाधा (Omicron Covid Variant in Pune) झाल्याचा अहवाल मिळाला होता. त्यांच्या संपर्कातील आणखी 4 जणांना ओमायक्रॉनची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, नायजेरीयातून आलेल्या 3 आणि त्यांच्या संपर्कातील 3 अशा एकूण 6 जणांच्या घशातील द्रवाचे नमुने जिनोम सिकव्हेंसिंगसाठी (Genome sequencing) पुण्यातील एनआयव्ही येथे पाठविले होते. तत्पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या 6 जणांना पिंपरी येथील नवीन जिजामाता रुग्णालयात गृहविलगीकरणात ठेवले होते. त्यापैकी 4 जण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. तसेच, दोघांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. मात्र, आता त्यांच्या संपर्कातील आणखी 4 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह (Positive) आले असल्याचे समोर आले आहे.
Web Title : Omicron Covid Variant in Pune | four other members nigerian family pimpri chinchwad were infected omicron covid variant
Mumbai NCB | NCB ने अटक केलेल्या आरोपीचा कारागृहात मृत्यू ; प्रचंड खळबळ
Shirdi Crime | शिर्डीत गोळीबाराचा थरार ! भल्या पहाटे तरुणावर झाडल्या गोळ्या; शिर्डीत खळबळ