Omicron Covid Variant | ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर देशात पुन्हा कठोर निर्बंध लागणार?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Omicron Covid Variant | दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने (Omicron Covid Variant) जगाला चिंतेत टाकलं आहे. तर इकडे भारताचीही चिंता वाढलीय. भारतात सध्या 236 हून जास्त रूग्ण संख्यांची नोंद आहे. यामधील 104 जण बरेही झालेत. महाराष्ट्रासह दिल्ली, तेलंगण, कर्नाटक, राजस्थान आणि केरळ या राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून (Central Government) देशात कठोर निर्णयाची (Lockdown) शक्यता आहे. याबाबत भाजपा खासदार सुब्रहमण्यम स्वामी (MP Subramanian Swamy) यांनी ट्वीटच्या माध्यमातून एक संकेत दिले आहेत.
देशातील नव्या ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काल (गुरुवारी) बैठक घेऊन कोरोनास्थितीचा आढावा घेतला. देशातील सर्व लसपात्र नागरिकांचे लवकरात लवकर संपूर्ण लसीकरण (Vaccination) करून घ्यावे, अशी सूचना देखील यावेळी पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यांना दिली आहे. तसेच, आपण सतर्क आणि सावध राहायला हवे, असे नमूद करत मोदी यांनी कोरोनाला अटकाव घालण्यासाठी खबरदारीच्या (strict restrictions) सुचना केल्या आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, खासदार सुब्रहमण्यम स्वामी (MP Subramanian Swamy) यांनी ट्वीट केलं असून लॉकडाउन (Lockdown) जाहीर झाला तर आश्चर्यचकित होऊ नका असं म्हटलं आहे. त्याचबरोबर ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश निवडणुकाही पुढे ढकलल्या जाऊ शकतात अशी शक्यता व्यक्त केली जातेय.
तर, ओमायक्रॉनमुळे लॉकडाउन जाहीर झाल्यास आणि उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवटीखाली निवडणुका सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्यास आश्चर्य वाटू देऊ नका.
यावर्षाच्या सुरुवातीला ज्या गोष्टी प्रत्यक्षपणे करु शकले नाहीत त्या पुढील वर्षी अप्रत्यक्षपणे केल्या जातील, असं खासदार सुब्रहमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे.
Web Title :- Omicron Covid Variant | covid 19 omicron bjp mp subramanian swamy tweet lockdown.
Comments are closed.