नवी दिल्ली : वृत्तसंस्था – OMG | आपण अनेकदा पाहिले असेल की काही लोक दारूची नशा चढल्यानंतर भाषा बदलतात. ते आपली भाषा सोडून इंग्रजी किंवा जुन्या हिंदी भाषेत बोलतात. तुम्ही हे सुद्धा पाहिले असेल की दारू प्यायल्यानंतर लोक नशेत विचित्र वागतात. परंतु सर्वात हैराण करणारी बाब ही आहे की, दारूची नशा चढल्यानंतर लोक इंग्रजी बोलू लागतात. मात्र याच लोकांना दारू प्यायलेले नसताना इंग्रजी बोलण्यात (OMG) अडचण वाटते.
जेव्हा एखादी व्यक्ती दारूच्या नशेत असते तेव्हा ती सामान्य माणसाच्या तुलनेत बिनधास्त (OMG) इंग्रजीत बोलू शकते. रिसर्चमध्ये ही बाब समोर आली की, मनुष्याला दारूच्या नशेत इतर भाषा शिकण्यात मदत होते. युनिव्हर्सिटी ऑफ लीव्हरपूलचे एक कॉलेज तसेच नेदरलँडच्या युनिव्हर्सिटी ऑफ मास्ट्रिचच्या रिसर्चर्सने यावर एक संशोधन केले आहे.
या रिसर्चमध्ये ही गोष्ट समोर आली आहे की, दारूच्या मात्रेमुळे लिंगुयस्टिक प्रोफिसिएंशी म्हणजे भाषा दक्षता वाढते. डच भाषा शिकणार्या 50 जर्मन लोकांच्या एका गटाला संशोधनात सहभागी करण्यात आले होते. यापैकी काही लोकांना हलक्या मात्रेत अल्कोहल देण्यात आले. तर काही लोकांना अल्कोहल देण्यात आले नाही.
यानंतर जर्मन लोकांच्या गटाला अल्कोहलचे ड्रिंक प्यायल्यानंतर नेदरलँडच्या डच भाषेत बोलण्यास सांगण्यात आले. यामधून समोर आले की, ज्या लोकांच्या ड्रिंकमध्ये अल्कोहल होते, त्यांनी शब्दांचा चांगला उच्चार केला. याशिवाय त्या लोकांमध्ये भाषेच्या वापरात अजिबात संकोच नव्हता.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दारूच्या नशेत हे लोक खुलून डच भाषेत बोलत होते.
या लोकांना त्यांच्या वजनाच्या तुलनेत हलक्या मात्रेत अल्कोहल दिले गेले.
हे परिणाम लोकांनी कमी प्रमाणात दारू पायल्यानंतर समोर आले.
जरी लोकांना दुसरी भाषा बोलणे अवघड असले, तरी दारूच्या नशेत हे शक्य होते.
मात्र, दारू प्यायल्याने तुमच्या स्मरणशक्तीवर आणि लक्ष केंद्रीत करण्याच्या क्षमतेवर वाईट परिणाम होतो.
Web Titel :- OMG | people start speaking english because of this after getting drunk a surprising revelation in research.
Pan-Aadhar Linking | आधार कार्डधारकांनी लवकर केले नाही ‘हे’ काम तर होईल मोठे नुकसान, जाणून घ्या