जम्मू : वृत्त संस्था – जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना राज्यात कलम 370 हटविल्यानंतर ताब्यात घेण्यात आले होते. 163 दिवसानंतर त्यांना त्यांच्या अधिकृत घरापासून जवळच असलेल्या घरात हलविण्यात आले आहे. अधिकार्यांनी सांगितले की ते सध्या हरी निवासमध्ये असून लवकरच त्यांना दुसरीकडे हलविण्यात येईल. कारण मंत्रिस्तरीय प्रतिनिधी मंडळ काश्मीर खोर्याच्या दौर्यावर येत असून काश्मीर प्रशासन त्यांची व्यवस्था हरी निवासमध्ये करणार आहे. उमर यांना ज्या घरात हलविण्यात येणार आहे ते त्यांच्या सरकारी घराच्या जवळच आहे. या प्रतिनिधी मंडळात रेल्वे मंत्री पीयूष गोयल, कायदा मंत्री रविशंकर प्रसाद आणि राज्यमंत्री किसन रेड्डी यांच्यासह अनेक मंत्री सहभागी झाले आहेत. हे मंडळ 5 ऑगस्टनंतर येथे सुरू झालेल्या विकासाच्या कामाचा आढावा घेतील आणि लोकांना सांगतील.
उमर यांचे वडील फारूक अब्दुल्ला आणि माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांच्यासह शेकडो राजकीय, सामाजिक कार्यकर्ते 5 ऑगस्टपासून अटकेत आहेत. यामध्ये फारूक अब्दुल्ला एकमेव राजकीय नेते आहेत जे 17 सप्टेंबरपासून पीएसएमध्ये बंद आहेत.
सरकारी कार्यक्रमात सुमारे चाळीस मंत्री सहभागी होणार आहेत. केंद्रीय मंत्री जिल्हा स्तरावरील जनसंपर्क कार्यक्रमात सहभागी होतील. 18 ते 20 जानेवारीपर्यंत होणार्या कार्यक्रमात केंद्रीय आणि राज्यमंत्री सहभागी होणार आहेत. 18 जानेवारीला अर्जुन राम, मेघवाल परमंडल, डॉ. जितेंद्र सिंह जम्मू, अश्विनी चौबे सांबातील कार्यक्रम करतील.
19 तारखेला केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी रियासीमध्ये कार्यक्रम करतील. महेंद्र नाथ पांडे जम्मू, अर्जुन राम मेघवाल कठुआमध्ये राहणार आहेत. वी मुरलीधरणसुध्दा कठुआ आणि अनुराग सिंह ठाकुर जम्मूमध्ये असणार आहेत. तर डॉ. जितेंद्र सिंह उधमपुर, पीयूष गोयल जम्मू आणि अश्विनी चौबे सांबामध्ये उपस्थित असतील. प्रताप सारंगी कठुआ, आर. के. सिंह डोडा, देवाश्री चौधरी जम्मूमध्ये असतील.
एकुण कार्यक्रमात सुमारे चाळीस मंत्री सहभागी होणार आहेत. भाजपाचे प्रदेश महासचिव संघटक अशोक कौल यांनी सांगितले की, कार्यक्रमाचे आयोजन सरकारी स्तरावर होईल. भाजपाचे नेते व कार्यकर्त्यांनी मंत्र्यांच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा.