नवी दिल्ली : वृत्तसंस्था- देशात नवीन मोटार वाहन कायदा 2019 लागू झाल्यानंतर लोक सोशल मीडियावर या नव्या तरतुदींची खिल्ली उडवताना दिसत आहेत. कोणी लिहितंय की, नव्या नियमानुसार आता वाहतूक नियम मोडणाऱ्याला मोठा दंड आकारला जाणार आहे. यात विना हेल्मेट गाडी चालवणं, ओवरलोडींग आणि इतर अनेक कडक तरतुदींचा समावेश आहे.
नव्या वाहतूक नियमांची घोषणा झाल्यानंतर सोशल मीडियावर विनोदांना उधाण आलं आहे. ज्याद्वारे वाढवलेल्या दंडाचा लोक वेगवेगळ्या पद्धतीने विरोध करत आहेत. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूपच व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ जुनाच आहे. परंतु नव्याने समोर आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “हेल्मेट नसताना गाडी चालवणं बेकायदेशीर आहे, ढकलत नेणं नाही.” व्हिडीओत दिसत आहे लोक पायी चालत गाडी ढकलत नेत आहेत.
https://twitter.com/kumarmanish9/status/1169257795809509376
आयपीएस अधिकारी पंकज नैन यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “हे खूप आनंददायक आहे. ट्राफीकच्या पावतीपासून वाचण्यासाठी नाविन्यपूर्ण युक्त्या. अशी परिस्थिती टाळण्यासाठी कृपया वाहतूकीचे नियम पाळा.” इतर युजर्सनेही या ट्विटची खूप मजा घेतली आहे.
This is hilarious.
Innovative ways to avoid traffic challans
☺️☺️Pls follow traffic rules to avoid such situations #MotorVehiclesAct2019 pic.twitter.com/hh7c1jWC80
— Pankaj Nain IPS (@ipspankajnain) September 3, 2019
https://twitter.com/bijendra125/status/1169143385095114753
https://twitter.com/kumarmanish9/status/1169257795809509376
एका युजरने एक व्हिडीओ शेअर करत लिहिले की, “यात काहीच नवीन नाही. मी 14 नोव्हेंबर 2018 ला अहमदाबादमध्येही अशीच स्थिती पाहिली होती.”