मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – मुंबईतीला एका तरुणीला एक वाईट अनुभव आला आहे. तिने तिचा अनुभव गरम संकट या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. तरुणीला एका वृद्ध व्यक्तीने थांबवून मोबाईल घेतला आणि चक्क पॉर्न व्हिडीओ लावण्याचा प्रयत्न केला. वृद्धाने HD पॉर्न लिहून इंटरनेटवर व्हिडीओ सर्च केला. ज्या ट्विटर अकाऊंटवरून तरुणीने हा अनुभव शेअर केला ते अकाउंट काही तासानंतर डिलीट करण्यात आले. याबाबत पोलिसांकडे कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. याबाबत आमची टेक्निकल टीम तपास करत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी दिली.
काल मुंबईतील डोंगरी येथे इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा बहाणा करून वृद्धाने तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला आहे. ट्विटरवरील पोस्टमध्ये तरुणी लिहिते की, मी हॉस्टेलला परत जात असताना एका वयोवृद्धाने मला थांबवलं. त्याने माझ्याकडे इंटरनेट असलेला मोबाईल आहे का विचारलं. डोंगरीतील इमारत पडल्याची बातमी मला दाखवशील का असं विचारलं. यावर मी त्याला एक बातमी दाखवली. त्यावर त्याने इंटरनेटवर सगळं मिळतं का असा प्रश्न विचारला. यावर मी त्याला हो म्हणाले.
या संवादानंतर त्या वयोवृद्धांच्या व्हॉईस कमांडद्वारे इसमे एचडी फोन देख सकते है क्या? असा प्रश्न विचारला. मोबाईलमध्ये व्हॉईस कमांड बंद असल्याचे त्याचा प्रश्न सर्च झाला नाही. यामुळे त्या वयोवृद्धाने त्या तरुणीच्या हातून मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोबाईल तरुणीच्या हातातच होता. तरी देखील त्या वयोवृद्धाने त्यावर HD PORN असं लिहून सर्च करायचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहिल्याने ती तरूणी घाबरली होती. दरम्यान, एका क्षणाचाही विलंब न लावता तिथून तातडीने निघून तो म्हातारा निघून गेली. ही वृद्ध व्यक्ती ६० वर्षाची असल्याचा अंदाज तरुणीने वर्तविला.