Oil India Limited Requirement | Oil India मध्ये ‘या’ पदांसाठी निघाली भरती, मिळेल 80,000 पर्यंत पगार, असा करा अर्ज

नवी दिल्ली : Oil India Limited Requirement | अनेक तरूणांचे सरकारी नोकरीचे स्वप्न असते. अनेकांना ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये नोकरी करायची असते. अशावेळ जर तुम्हाला ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये नोकरी पाहिजे असेल तर अर्ज करू शकता. कंपनीने केमिस्ट, ड्रिलिंग इंजिनियर, जियोलॉजिस्ट आणि सिव्हिल इंजिनियर या पदांसाठी भरती काढली आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट आहे.

एकुण पदे आणि संख्या

केमिस्ट – 2 पदे
ड्रिलिंग इंजिनियर – 2 पदे
जियोलॉजिस्ट – 2 पदे
सिव्हिल इंजिनियर – 1 पद
एकुण पदे 7

वयोमर्यादा

केमिस्ट – किमान 24 वर्षे, कमाल 50 वर्षे

ड्रिलिंग इंजिनियर, जियोलॉजिस्ट आणि सिव्हिल इंजिनियर – किमान 24 वर्षे, कमाल 40 वर्षे

वेतन

केमिस्ट आणि सिव्हिल इंजिनियर – 70000 रुपये महिना

ड्रिलिंग इंजिनियर आणि जियोलॉजिस्ट – 80000 रुपये महीना

अशी होईल निवड

ऑयल इंडिया लिमिटेडच्या या पदांवर नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांना वॉक इन इंटरव्ह्यू द्यावा लागेल. इंटरव्ह्यूच्या आधारावर उमेदवारांना या पदांवर नोकरी मिळेल.