पंढरपूर : बहुजननामा ऑनलाईन – पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित केली होती. त्या सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. त्यावेळी सभेत मोठ्या संख्येने लोंकाची गर्दी झाली होती. या झालेल्या गर्दीवरून राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथे राष्ट्रवादीचे उमेदवार घेतलेले भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी (८ एप्रिल) ला अजित पवार यांनी सभा घेतली. त्या सभेला पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी पंढरपुरात अजित पवारांच्या उपस्थितीत भाजप नेते कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादीत झेंडा हातात घेतला आहे. तसेच, या सभेला केवळ २०० लोंकाची परवानगी होती. मात्र इथे नियम धुडकावल्याचा प्रकार झाला आहे. सभेवेळी २०० पेक्षाही अधिक लोंकाची गर्दी दिसून आली. या कार्यक्रमात कोरोना नियमाचा येथे फज्जा उडाला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी अजित पवारांचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामुळे त्यांच्यावर कोरोना कालावधीत लावलेल्या निर्बंधाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पंढरपूर शहर पोलिसात कलम १८८ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.