बहुजननामा ऑनलाईन टीम : ओडिशाच्या बारीपाडा येथील रुग्णवाहिकेतून एका गर्भवती महिलेला शासकीय रुग्णालयात नेले जात होते, परंतु रुग्णवाहिकेचे पेट्रोल संपल्याने गाडी वाटेतच अडकून राहिली, यामुळे त्या महिलेचा मृत्यू झाला. या घटनेने बेजबाबदार प्रशासकीय यंत्रणेचा पर्दाफाश झाला आहे. हांडा गावच्या चितरंजन मुंडा यांची पत्नी तुळशी मुंडा शुक्रवारी रात्री प्रसूतिपासून त्रस्त होती, त्यानंतर तिला बांगिरिपोशी सामुदायिक आरोग्य केंद्रात (सीएचसी) दाखल केले गेले. महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी तिला पंडित रघुनाथ मुर्मू मेडिकल कॉलेज व रुग्णालयात (पीआरएमएमसीएच) पाठविण्यास सांगितले.
यानंतर शुक्रवारी रात्री रुग्णवाहिका गरोदर महिलेसह बारीपाड्यातील पीआरएमएमसीएचला रवाना झाली. जेव्हा रुग्णवाहिका महिलेसाठी पीआरएमएमसीएचकडे जात होती, तेव्हा तिच्यातील इंधन संपले असा आरोप केला जात आहे. बरिपडा शहराच्या बाहेरील भागात रुग्णवाहिकेचे इंधन संपल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे गर्भवती महिलेला ४५ मिनिटे थांबविण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार , ४५ मिनिटे थांबल्यानंतर आणखी एक रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली, परंतु तोपर्यंत त्या महिलेचा मृत्यू झाला. मृत महिलेचे पती चित्तरंजन मुंडा म्हणाले की, रुग्णवाहिकेचे इंधन जाताना संपले, यानंतर आशा कार्यकर्त्यांनी दुसरी रुग्णवाहिका बोलविली. तोपर्यंत जवळपास एक तास निघून गेला होता.आम्ही रुग्णालयात पोहोचलो तेव्हा डॉक्टरांनी माझ्या पत्नीला मृत घोषित केले.या प्रकरणात, मयूरभंजचे मुख्य जिल्हा वैद्यकीय अधिकारी प्रदीप महापात्र म्हणतात की, मला आज या दुर्दैवी घटनेची माहिती मिळाली आहे. रुग्णवाहिकेच्या चालकाच्या म्हणण्यानुसार, वाहनाची तेलाची पाईप मध्यभागी फुटली. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल.
Visit : bahujannama.com