बुलडाणा : बहुजननामा ऑनलाइन – OBC Reservation | केंद्रातील भाजप सरकारने (BJP Government) ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) बळी घेतला असल्याचा घणाघाती आरोप मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरुन विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील (Buldana District) शेगाव येथे बोलत असताना त्यांनी केंद्र सरकारवर (Central Government) टीका केली आहे.
… मंत्रिपदाचा त्याग करणार
वेळ पडली तर मी मंत्रिपदाचा (Resign Ministry) देखील त्याग करेन असा सूचक इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. कुणीही कायमचे सत्तेसाठी आलेले नसताना ‘मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल म्हटलं होतं’ असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला. तर ओबीसी समाजासाठी मी आहे आणि त्यासाठी मला समाज महत्त्वाचा असून त्यासाठी मी मंत्रिपद देखील सोडू शकतो असा सूचक इशारा वडेट्टीवार यांनी दिला. जर महाराष्ट्र सरकारकडून (Government of Maharashtra) ओबीसींवर (OBC Reservation) अन्याय झाला तर मी काय करावं? हे मुख्यमंत्री यांना विचारावं लागेल, असेही ते म्हणाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
तांत्रिक बाबीसाठी समाजाला वेठीस धरणे चुकीचे
काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी दिल्ली येथे प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि माजी खासदार समीर भुजबळ (Former MP Sameer Bhujbal) यांच्यासोबत ओबीसी आरक्षण प्रश्नी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह जेष्ठ विधितज्ञ यांच्या भेटी घेतल्या. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी राखीव 27 टक्के जागांवर निवडणूक घेण्यास पुढील निर्णयापर्यंत स्थगिती दिली होती. मात्र, ही तांत्रिक बाब आहे यासाठी संपूर्ण समाजाला वेठीस धरणे चुकीचे आहे. यासाठी आम्ही न्यायालयीन लढाई ढलत असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले होते.
Web Title :- OBC Reservation | obc reservation congress leader vijay wadettiwar said i can resign from ministry if obc will not get justice