पुणे : बहुजननामा ऑनलाइन – न्यूड फोटोशूट (Nude Photo Shoot) केल्याने रणवीर सिंग (Ranveer Singh) चांगलाच अडचणीत अडकला आहे. त्याच्याविरुद्ध मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यात (Chembur Police Station) गुन्हा (FIR) दाखल झाल्यानंतर आता पुण्यात (Pune Police) देखील गुन्हा दाखल झाला आहे. न्यूड फोटोशूट (Nude Photo Shoot) प्रकरणी पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) तक्रार देण्यात आली आहे. मनसे शारीरिक सेनेने (MNS Physical Sena) ही तक्रार दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अभिनेता रणवीर सिंग याच्या विरोधात मनसे शारीरिक सेना, पुणे शहर यांच्यावतीने पोलीस आयुक्तालयात (Police Commissionerate) तक्रार करण्यात आली आहे. मनसे शारीरिक सेना, पुणे शहराचे अध्यक्ष निलेश काळे (Nilesh Kale) यांच्याकडून कलम 354, 509, 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
सोशल मीडियावर न्यूड फोटो प्रसिद्ध करुन हिंदू संस्कृतीचा अपमान करत व स्त्रियांना फोटो पाहताना लाज वाटेल असे व तरुण वर्गाला बिघडवण्याची, त्यात वयात येणारी लहान मुले यांच्यावर वाईट संस्कार होण्याची भीती दर्शवली आहे, असा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.
आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावरुन लवकरात लवकर काढावे अशी माहिती मनसेकडून करण्यात आली आहे.
प्रसिद्ध अभिनेत्याचे अनुकरण इतर लोक पण करु शकतील असा अंदाज वर्तवत या
अभिनेत्याच्या कृत्यांना चाप बसला पाहिजे, अशी मागणी यावेळी मनसेकडून करण्यात आली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Nude Photo Shoot | complaint against ranveer singh by mns physical sena in case of nude photo shoot
हे देखील वाचा :
MNS | ‘अमित ठाकरेंच्या आजारपणात शिवसेनेने राज ठाकरेंना दगा दिला’ – संदीप देशपांडे