मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – नग्न अवस्थेत रस्त्यावर फिरणाऱ्या एका मनोरुग्णाने नागपाडा जंक्शन परिसरात नागपाडा पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबलच्या डाव्या हाताच्या बोटाचा चावा घेतला. चावा घेतल्यामुळे पोलिसाच्या बोटाचा तुकडा पडला आहे. या जखमी पोलीस कॉन्स्टेबलचे नाव जनार्दन साखरे असं आहे.
पोलिसाच्या बोटाचा तुकडा पडला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आले होते असल्याची माहिती नागपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांनी दिली. सुलेमान हा मनोरुग्ण असून तो पूर्वी ठाण्यात राहत होता. आता तो वडाळ्यात राहत असल्याची माहिती त्याच्या पालकांनी दिली आहे.
शफिक अहमद सुलेमान (४५) नावाचा मनोरुग्ण नग्न अवस्थेत नागपाडा जंक्शन परिसरात गोंधळ घालत होता. त्यावेळी पोलीस कॉन्स्टेबल जनार्दन साखरे हे ड्युटीवर होते. मनोरुग्णाचा हा गोंधळ पाहून घटनास्थळी जमलेल्या जमावाने पोलिसांना मदतीची मागणी केली. त्यानंतर जनार्दन साखरे मदतीसाठी गेले असता मनोरुग्णाने त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्या शेजारील बोटाचा कडाडून चावा घेतला. त्या मनोरुग्णाला उद्या न्यायालयात हजर करण्यात येईल अशी माहिती शर्मा यांनी दिली.