नवी दिल्ली : वृत्तसंस्था – NPS | भविष्यात तुमची पत्नी पैशासाठी कोणावर अवलंबून राहू नये असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही तिच्यासाठी नियमित उत्पन्नाची व्यवस्था करू शकता. न्यू पेन्शन सिस्टम (NPS) खाते पत्नीच्या नावाने उघडू शकता. NPS खाते पत्नीला वयाच्या 60 व्या वर्षी एकरकमी रक्कम देईल (National Pension Scheme).
याशिवाय दरमहा पेन्शनचा लाभ मिळेल. हे पत्नीचे नियमित उत्पन्न असेल. NPS Account चा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला दरमहा किती पेन्शन हवे आहे हे तुम्ही स्वतः ठरवू शकता. वयाच्या 60 व्या वर्षी पत्नीला पैशाची कमतरता भासणार नाही.
पत्नीच्या नावाने NPS खाते उघडा
तुम्ही पत्नीच्या नावावर ’न्यू पेन्शन सिस्टम’ (National Pension Scheme) खाते उघडू शकता. यात सोयीनुसार दरमहा किंवा वार्षिक पैसे जमा करण्याचा पर्याय आहे. (NPS Account) NPS खाते पत्नीच्या नावाने 1000 रुपयांनीही उघडता येते. एनपीएस खाते वयाच्या 60 व्या वर्षी मॅच्युअर होते. नवीन नियमांनुसार, तुम्हाला हवे असल्यास, पत्नीचे वय 65 वर्षे होईपर्यंत एनपीएस खाते चालू ठेवा.
रू. 5000 मासिक गुंतवणुकीने होईल रू. 1.14 कोटींचा फंड
उदाहरणार्थ, तुमची पत्नी 30 वर्षांची आहे आणि तुम्ही तिच्या एनपीएस खात्यात दरमहा 5000 रुपये गुंतवले. जर वार्षिक गुंतवणुकीवर 10 टक्के रिटर्न मिळाला, तर वयाच्या 60 व्या वर्षी तिच्या खात्यात एकूण 1.12 कोटी रुपये असतील. यातून तिला सुमारे 45 लाख रुपये मिळतील. याशिवाय तिला दरमहा सुमारे 45 हजार रुपये पेन्शन मिळू लागेल. ही पेन्शन तिला आयुष्यभर मिळत राहील.
किती मिळेल एकरकमी रक्कम आणि पेन्शन
– वय – 30 वर्षे
– एकूण गुंतवणुकीचा कालावधी – 30 वर्षे
– मासिक योगदान – रु 5,000
– गुंतवणुकीवर अंदाजे रिटर्न – 10%
एकूण पेन्शन फंड –
– 1,11,98,471 मॅच्युरिटीवर रुपये काढू शकता
– 44,79,388 रु. एन्युटी प्लॅन खरेदी करण्यासाठी
– 67,19,083 रु. अंदाजे एन्युटी रेट 8%
– मासिक पेन्शन – रु 44,793.
फंड मॅनेजर करतात अकाऊंट मॅनेजमेंट
NPS ही केंद्र सरकारची सोशल सिक्युरिटी स्किम (Social Security Scheme) आहे.
तुम्ही या योजनेत गुंतवलेले पैसे व्यावसायिक फंड मॅनेजरद्वारे व्यवस्थापित केले जातात. केंद्र सरकार या व्यावसायिक निधी व्यवस्थापकांना ही जबाबदारी देते.
अशावेळी तुमची NPS मधील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे. मात्र, या योजनेत तुम्ही गुंतवलेल्या पैशावर रिटर्न मिळण्याची खात्री नाही. वित्तीय नियोजकांच्या मते, एनपीएसने सुरुवातीपासून आतापर्यंत वार्षिक सरासरी 10 ते 11 टक्के रिटर्न दिला आहे.
Web Title :- NPS | national pension scheme how to get double benefit of wife nps account you may earn rs 11198471 on maturity and rs 44793 against pension
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update