नवी दिल्ली : नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) डिजिटल पेमेंटसला प्रोत्साहन देण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. एनपीसीआयने रुपे डेबिट कार्डच्या व्यवहारावर व्यापारी सवलत दर (एमडीआर) कमी केला असून २० ऑक्टोबरपासून हा नवीन एमडीआर लागू होणार आहे. एनपीसीआयच्या म्हणण्यानुसार डेबिट कार्ड व्यवहारांवर देण्यात आलेली ही सूट सर्व प्रकारच्या पॉईंट ऑफ सेल (पीओएस) वर लागू होईल. याशिवाय नवीन दर ईकॉम आणि भारतक्यूआर कोड आधारित व्यापारी व्यवहारांवरही लागू होतील.
एमडीआरमध्ये पॉईंट ऑफ सेल (पीओएस), ईकॉम आणि भारतक्यूआर कोड आधारित मर्चंट ट्रान्झॅक्शनमध्ये बदल करण्यात आले आहे. २,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी एमडीआरमध्ये ०.६० टक्क्यांपर्यंत सुधारित करण्यात आले असून प्रत्येक व्यवहार जास्तीत जास्त १५० रुपये मर्यादेसह आहे. सध्या प्रत्येक व्यवहारासाठी १००० रुपयांच्या उच्च मर्यादेसह २,००० रुपयांच्या वरच्या व्यवहारांसाठी ते ०.९० टक्के आहे. भारत क्यूआर म्हणजेच कार्ड आधारित क्यूआर व्यवहारांवरील एमडीआरही कमी करून ०.५० टक्के करण्यात आले असून जास्तीत जास्त एमडीआर प्रति एमडीआर १५० रुपये असेल. एनपीसीआयच्या मते, एमडीआर दर कमी करून आणि जास्तीत जास्त मर्यादा कमी केल्यामुळे आता व्यावसायिक डेबिट कार्डचा व्यवहार करण्यास प्रोत्साहित दिले जाईल. आतापर्यंत उच्च दरामुळे याद्वारे व्यवहार टाळत आहे.
यापूर्वी एनपीसीआयने मोबाइल पेमेंट अॅप भीम यूपीआय व्यवहारासाठी मर्चंट डिस्काउंट रेट (एमडीआर) मध्ये बदल केला होता. मोठ्या व्यवहारासाठी एमडीआरची कमाल मर्यादा १०० रुपये निश्चित केली गेली आहे. त्याच वेळी, १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे यूपीआय व्यवहार, जे क्यूआर कोड ‘स्कॅन आणि पे’ द्वारे केले जातात, त्यांना यापुढे कोणतेही एमडीआर द्यावे लागणार नाही. जास्तीत जास्त १०० रुपयांच्या व्यवहारासह एमडीआर सुधारित ०.३० टक्के करण्यात आला आहे. सध्या २,००० रुपयांपर्यंतच्या व्यवहारांसाठी ०.२५ टक्के आणि २,००० रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांसाठी ०. ६५ टक्के आहे. नवीन एमडीआर दर १ऑक्टोबरपासून लागू होतील.
काय आहे MDR ?
क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे ग्राहकांकडून पेमेंट स्वीकारण्यासाठी एमडीआर एका व्यापाराकडून बँकेला दिले जाते. पी२पीएम व्यवहारांची मर्यादा ५०, ००० वरून १ लाखांपर्यंत वाढवण्यासह एनपीसीआय यूपीआयचा वापर करुन व्यापारी पेमेंट्स करण्यासाठी अनेक पावले उचलत आहे.