भोपाळ : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान उरकले आहे. आणखी दोन टप्प्यातील मतदान बाकी आहे त्यात भोपाळ मध्ये अजून मतदान होणार आहे परंतु भोपाळमधील निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे तसे भोपाळमधील राजकीय वातावरण अधिकाधिक तापत चालले आहे.
अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या बाजूने कॉम्पुटर बाबा यांनी हजारो साधूंना सोबत घेऊन प्रचार सुरू केला आहे. तसेच भोपाळमध्ये हठयोग आयोजित करण्यात आला आहे. कॉम्पुटर बाबा म्हणाले कि ‘भाजपा सरकार गेली पाच वर्ष सत्तेत आहे.परंतु सरकारने राम मंदिराचा मुद्दा अजून तसाच ठेवला आहे . राम मंदिर कधी उभारणार आहे तसेच आता राम मंदिर नाही तर मोदी पण नाही’ असं म्हटलं आहे. दिग्विजय सिंह यांनी कॉम्प्युटर बाबांसोबत पूजा आणि हवनमध्ये सहभाग घेतला. या पुजेसाठी हजारो साधू भोपाळमध्ये पोहचले आहेत. या सगळ्यांचा राजकीय फायदा दिग्विजय सिंह यांना होईल का यांवर सगळ्याचे लक्ष लागले आहे
MP:Computer Baba who was granted status of minister in BJP govt,camps in Bhopal along with thousands of sadhus to undertake Hat Yoga,also campaigns for Congress leader Digvijaya Singh,says,"BJP sarkaar 5 saal mein Ram Mandir bhi nahi bana paayi. Ab Ram Mandir nahi toh Modi nahi" pic.twitter.com/BvvgBU7HxC
— ANI (@ANI) May 7, 2019