नवी दिल्ली : क्रेडिट कार्ड पेमेंट प्लॅटफॉर्म क्रेडद्वारे तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डने सुद्धा घराचे मासिक भाडे भरू शक ता. इतकेच नव्हे कंपनी सध्या क्रेडिट कार्डने केलेल्या पेमेंटवर 2021 रुपयांपर्यंत गिफ्ट व्हाऊचर सुद्धा देत आहे.
मासिक घरभाडे भरण्यासाठी 1.65 टक्के जास्त चार्ज पण…
मात्र, क्रेड अॅपद्वारे क्रेडिट कार्डने मासिक घरभाडे भरल्यास 1.5 टक्के जादा चार्ज सुद्धा द्यावा लागतो, परंतु तुम्हाला कॅशबॅक किंवा रिवॉर्ड पॉईंट्स सुद्धा मिळतात. सध्या क्रेड अॅपवर एक चांगली ऑफर सुरू आहे, ज्यामध्ये एक हजार रुपयांपर्यंतचे कॅशबॅक मिळत आहे. मात्र, वेगवेगळ्या क्रेडिट कार्डवर वेगवेगळी ऑफर सुरू आहे.
HDFC Bank Credit Card – कमाल 2021 रुपयांपर्यंतचे गिफ्ट व्हाऊचर
Bank of Baroda Credit Card – कमाल 1000 रुपये कॅशबॅक
Indusind Bank Credit Card – फ्लॅट 250 रुपये कॅशबॅक
Axis Bank Credit Card – कमाल 500 रुपये कॅशबॅक
क्रेडिट कार्डने भाडे भरल्यास मिळतात अनेक लाभ
1. क्रेडिट लिमिटचा वापर करून तुम्ही कॅश वाचवू शकता. क्रेडिट कार्डची देणे रक्कम समान्यपणे 45-50 दिवसानंतर द्यावी लागते. अशाप्रकारे रेंटचे पैसे कुठेतरी गुंतवू शकता.
2. क्रेडिट कार्डद्वारे करण्यात आलेल्या ट्रांजक्शनला तुम्ही ईएमआयमध्ये कन्व्हर्ट करू शकता. याचा अर्थ हा आहे की, तुम्ही रेंट सुद्धा ईएमआयद्वारे चुकवू शकता.
3. क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या ट्रांजक्शनवर कॅशबॅक किंवा रिवॉर्ड पॉईंट्स सुद्धा मिळतात.
काय आहे क्रेड अॅप
फ्रीचार्जचे को-फाऊंडर असलेले कुणाल शाह यांनी 2018 मध्ये एक नवीन स्टार्टअप क्रेड लाँच केले होते. या अॅपद्वारे जर तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल भरले तर कॅशबॅकसह अनेक रिवार्ड मिळू शकतात. या अॅपमध्ये जेवढ्या रूपयांचे क्रेडिट कार्डचे बिल भराल तेवढे क्रेड क्वाइन मिळवू शकता आणि वेगवेगळ्या कंपन्यांकडून फ्री किंवा डिस्काऊंटेड रिवार्ड मिळवू शकता.