नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बहुजननामा ऑनलाईन – देशात मोठ्या प्रमाणात कोविड -19 लसीकरण केले जात आहे. आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सला लस दिल्यानंतर आता सर्वसामान्यांचा नंबर देखील लवकरच येणार आहे. त्यात बर्याच कंपन्या IT company आपल्या कर्मचार्यांच्या कोरोना लसीचा खर्च उचलण्याची योजना आखत आहेत. आयटी IT company क्षेत्रातील कंपनी कॉग्निझंटने म्हटले की, ते भारतातील आपल्या दोन लाख कर्मचारी, त्यांचे कुटुंबातील सदस्य, कंत्राटी कामगार आणि सहाय्यक कर्मचार्यांसह सहा लाखाहून अधिक लोकांना कोविड – 19 लसीचा खर्च उचलणार आहे.
कॉग्निझंट इंडियाचे अध्यक्ष व एमडी राजेश नंबियार यांनी एका ई-मेल निवेदनात म्हटले की, “कोविड -19 साथीच्या आजारामुळे भारतासाठी मागील वर्ष अतिशय त्रासदायक होते. यावेळी, आमच्या कर्मचार्यांनी जगभरातील कोट्यावधी लोकांना महत्वाच्या सेवा प्रदान करण्यात महत्वाची भूमिका बजावली. कॉग्निझंटने ग्राहक आणि समुदायाद्वारे कोरोना कालावधीत पुढे राहून लोकांची सेवा करणाऱ्या कर्मचार्यांनाही त्यांची सेवा दिली. ते म्हणाले की, आता कोविड – 19 ची लस अखेर लोकांपर्यंत पोहोचली आहे, कंपनीने भारतातील सहा लाखाहून अधिक लोकांच्या लसीकरणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
अनेक कंपन्यांनी केली घोषणा
याआधी आयटी जायंट इन्फोसिस, सॉफ्टवेअर कन्सल्टिंग फर्म अॅक्सेन्चर, फ्रेंच आयटी कंपनी कॅपजेमिनी, क्लीन एनर्जी कंपनी रिन्यू पॉवर, आरआयएल, टीव्हीएस मोटर, फ्लिपकार्ट, एनटीपीसी, एसबीआय, वेदांत या खासगी आणि सरकारी कंपन्यांनी कर्मचार्यांच्या कोविड लसीचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
देशात सुरू झाली 2.O Vaccination लसीकरण मोहीम
1 मार्चपासून देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. लसीकरणात, 60 वर्षांपेक्षा जास्त व 45 ते 60 वर्षे वयोगटातील गंभीर आजााराने ग्रस्त लोकांना लसीचे डोस दिले जात आहेत . लोक सरकारी रुग्णालयांमध्ये तसेच खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना लस घेेेत आहे. 1 मार्च रोजी पंतप्रधान मोदींना कोरोनाचा पहिला डोस मिळाला, तर पंतप्रधान मोदींनी सर्वांना काळजी न करता लसीकरण करण्यास सांगितले.