बहुजननामा ऑनलाईन टीम : सरकारी नोकरी करु इच्छिणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकारमधील ‘ब’ आणि ‘क’ श्रेणीतील नोकऱ्यांसाठी सामायिक पात्रता परीक्षा म्हणजेच सीईटी घेण्याचा निर्णयाची तयारी सुरू असून ही सीईटी एकाच संस्थेमार्फत घेण्याचाबाबतही विचार सुरू आहे. यूपीएससीसाठी म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी नागरी सेवा परीक्षा घेण्यात येतात. भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजेच (IAS), भारतीय परराष्ट्र सेवा (IFS), भारतीय पोलिस सेवा(IPS) आणि भारतीय वन सेवा (IFOS) तसेच ‘अ’ आणि ‘ब’ श्रेणीतील राजपत्रित पदांसाठीही या परीक्षा घेण्यात येतात.
केंद्र सरकारमधील ब श्रेणीतील पदे भरण्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे परीक्षा घेतली जाते. या पद्धतीत सुधार आणण्यासाठी आता केंद्र सरकारने सीईटीद्वारे या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. ब श्रेणीतील राजपत्रित अधिकारी काही पदं, अराजपत्रित अधिकारी पदं आणि ब श्रेणीतील पदांसाठी या सीईटी घेऊन एकाच संस्थेकडे या परीक्षांचे व्यवस्थापन देण्याचा सरकारचा विचार आहे. केंद्रीय कार्मिक मंत्रालयाने याबाबत हा निर्णय घेतला आहे.
दरवर्षी केंद्र सरकारमध्ये सव्वा लाख पदांसाठी परीक्षा घेतल्या जातात. त्याचे विभागही वेगवेगळे असतात. परंतु आता एकच संस्था सीईटी परीक्षा घेणार असून या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणार आहे. ज्याचा उमेदवारांनाही लाभ होणार असून फी मध्ये सवलत मिळणार आहे. एकाच संस्थेकडून परीक्षा घेतल्यास ग्रामीण भागातील उमेदवारांनाही त्याचा लाभ होईल.दरम्यान, केंद्रीय विभागातील ६ लाख ८३ हजार ८२३ पदांवर हि मेगाभरती होणार आहे. त्यातील क श्रेणीतील ५ लाख ७४ हजार २८९ जागा, ब श्रेणी – ८९ हजार ६३८ जागा आणि १९ हजार ८९६ जागा अ श्रेणीसाठी आहे.
Visit : bahujannama.com