बहुजननामा ऑनलाईन – हिमाचलच्या माजी सैनिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. ७५ वर्षापेक्षा जास्त वयाचे माजी सैनिक आता थेट सैनिकी रुग्णालयातून उपचार घेऊ शकतात. यापूर्वी त्यांना याच सैनिकी रुग्णालयात ईसीएचएस पॉली क्लिनिकमधून रेफर घ्यावा लागत होता. या सुविधेचा लाभ माजी सैनिकांबरोबरच त्यांची पत्नी आणि आई- वडिलांना देखील मिळणार आहे. सैनिकी रुग्णालयाच्या उपचारात त्यांना प्राथमिकता देण्यात येईल.
७५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे माजी सैनिक थेट सैनिकी रुग्णालयात जाऊ शकतील. यामुळे लाभार्थ्यांचा वेळ वाचणार आहे, तसेच कागदपत्रांच्या प्रक्रियेतूनही त्यांची सुटका होणार आहे. पण ७५ पेक्षा कमी वय असणाऱ्या माजी सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पॉली क्लिनिकमधून रेफर लिहून घ्यावे लागेल.
ईसीएसएस पॉली क्लिनिक हमीरपूरचे प्रभारी अधिकारी कर्नल कृष्ण चंद यांनी सांगितले की, ईसीएचएस सेंट्रल ऑर्गेनाइजेशनने ७५ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबांना रेफर शिवाय सैनिकी रुग्णालयात जाण्याची परवानगी दिली आहे.
Visit : bahujannama.com