नवी दिल्ली : आधार कार्ड एक महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. आधार कार्डबाबत एक विशेष आपडेट आले आहे. आता तुम्ही आधार कार्डला फेस कॅमच्या माध्यमातून सुद्धा डाऊनलोड करू शकता. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत फेस कॅमद्वारे डाऊनलोड करण्याची पद्धत…
Aadhar Card Face Cam : असे करा डाऊनलोड
* गुगलमध्ये सर्वप्रथम तुम्ही UIDAI सर्च करा. सर्वात पहिल्या ऑपशनवर तुम्हाला वेबसाइट uidai.gov.in वर क्लिक करा.
* यानंतर तुम्हाला नवीन पेज मिळेल, ज्यामध्ये अनेक ऑपशन दिसतील. तुम्ही पेजवर खाली पाहिले तर ऑपशन मिळेल गेट आधार कार्ड आणि अपडेट आधार कार्ड.
* गेट आधार कार्डच्या ऑपशनवर तुम्हाला आणखी एक ऑपशन मिळेल, डाऊनलोड आधार कार्ड, त्यावर क्लिक करा. ज्यानंतर तुम्ही एका नवीन पेजवर जाल. या पेजवर तुम्हाला आधार कार्डच्या ऑपशनच्या खाली फेस ऑथचे ऑपशन मिळेल.
* फेस ऑथ वर क्लिक करण्यापूर्वी आपला मोबाईल नंबर टाका, सोबतच कॅप्चा टाका. हे टाकल्यानंतर तुम्ही फेस ऑथवर क्लिक करा. क्लिक करताच एक इन्स्ट्रक्शन पेज दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला याकडे लक्ष द्यावे लागेल की, तुम्हाला तुमचा फोटो कशाप्रकारे फेस ऑथच्या समोर क्लिक करायचा आहे. यानंतर तुम्ही ओकेचे बटन दाबा.
* ज्यानंतर तुमचा कॅमेरा ओपन होईल. तुम्ही लाइटकडे लक्ष देत कॅमेर्यासमोर आपला चेहरा आणा आणि वेबसाईट आपोआप फोटो क्लिक करेल. फोटो क्लिक होताच तुमचे आधार डाऊनलोड होईल.