मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – डोंबविली परिसरात घरकाम करत उदरनिर्वाह करणाऱ्या एका मोलकरणीला आयकर विभागाची नोटीस आली आहे. तब्बल १० कोटी रुपयांचा कर थकविल्याची नोटीस आल्याने या महिलेला धक्काच बसला आहे. तरुलता शाह (५५ ) असे या महिलेचे नाव आहे. कर थकविल्याची नोटीस मिळताच तिने पोलिसांकडे धाव घेतली असून, महिलेने दाखल केलेल्या तक्रारींनुसार लोकमान्य टिळक मार्ग पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या मालकाच्या कार्यालयात तरुलता काम करत होत्या, तेथे आलेल्या व्यावसायिकाने तारुलता यांच्या अशिक्षितपाणाचा फायदा घेत त्यांची कागदपत्रे घेतली. आणि त्या कागदपत्रांच्या आधारे बनावट कंपनी उघडून कोट्यावधींचे व्यवहार केल्यामुळे कर थकविल्याची नोटीस तरूतला यांना मिळाली आहे.
तारुलता शाह या पतीच्या निधनानंतर चार मुलांची जबाबदारी संभाळत होत्या. अनेक कार्यालये आणि घरांमध्ये घरकाम करत त्या आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात. डोंबिवलीत एका सीएकडे सफाईचे काम करत असताना २००६ मध्ये त्यांची ओळख मशीद बंदर येथील पंकज बोरा (५५) सोबत झाली. बोराने त्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत ओळख वाढविली. त्याने शाह यांना व्यवसायासाठी मदत करत त्यांचे बँकेत खाते उघडून देण्याचे आमिष दाखविले. आणि त्यांच्या घरी जात त्यांच्या रेशन कार्डसह, इतर महत्त्वाची कागदपत्रे घेतली. त्याच कागदपत्रांच्या आधारे ‘मे. जेमल इंटरप्रायजेसच्या’ नावाने झवेरी बाजार येथील एका बँकेच्या शाखेत खाते उघडले. त्यानंतर, मे क्रिएटिव्ह इंटरप्रायजेस नावाने डोंबिवलीत दुसरे बनावट खाते उघडून, २००७ ते २०१७ दरम्यान कोट्यवधींची व्यवहार केले. त्यांच्या सह्यांचा वापर करून तो चेकने ते पैसे काढत होता.
माझ्या अशिक्षितपणाचा फायदा घेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल केली. त्याने माझ्यासारख्या अनेकांना अशाच प्रकारे गंडा घातला आहे. पोलिसांवरच विश्वास असून, त्यांनी आरोपीला लवकरात लवकर पकडून योग्य ती कारवाई करावी, असे तारुलता यांनी सांगितले आहे.
दरम्यान, तारुलता यांना २०१७ मध्ये आयकर विभागाची नोटीस आली. यात, २०१० -११ मध्ये ४ कोटी १० लाख ७४ हजार रुपये तर २०११-१२ मध्ये ६ कोटी १ लाख ५४ हजार रुपयांचा कर चुकविल्याचे नमूद करण्यात आले होते.
Visit : Policenama.com
- भात खाण्याचे ‘हे’ १० फायदे जाणून तुम्ही व्हाल थक्क ! बिनधास्त करा सेवन
- क्रिस्टिना सिल्वाने ‘मस्कुलर बॉडी’ कशी बनवली ? जाणून घेवूयात रहस्य
- वजन कमी करण्यासाठी ‘हा’ आहे सर्वोत्तम उपाय, जाणून घ्या
- ‘हे’ पदार्थ जास्त खाल्ले तर लवकर होऊ शकता म्हातारे, वेळीच करा उपाय
- भातामुळे वाढत नाही लठ्ठपणा, जाणून घ्या आहारतज्ज्ञ काय सांगतात
- मुलांना लहानपणापासूनच लावा मैदानी खेळांची सवय, उत्तरार्धातही राहतील फिट
- सावधान ! जास्त फळे खाल्ल्याने वाढू शकते वजन, जाणून घ्या कारणे
- गर्भातच मुलाला मिळेल अनुवंशिक आजारातून मुक्तता
- ‘सिक्स पॅक्स अॅब्स’ हवेत का ? मग ‘हे’ सोपे व्यायाम प्रकार आवश्य करा
- पौष्टिक पदार्थांपेक्षाही ‘पाणी’ आहे सरस !