मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी विधान केल्यानंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. अशोक चव्हाण यांनी आमचा सिनेमा चालला तर चालतो किंवा पडला तर पडतो. सांगता येत नाही. सुदैवाने आमचा सिनेमा बरा चालला आहे, असे म्हणत शिवसेनेकडून लिहून घेतल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. पण आता शिवसेनेचे आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदेंनी या विधानाबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.
थोरात यांनी आमचा सिनेमा हा मल्टीस्टारर असून तो यशस्वी होणार, असे म्हटले आहे. तर संविधानाच्या चौकटीत राहून हे सरकार चालले पाहिजे, तसे न झाल्यास सरकारमधून बाहेर पडायच, अशी सूचना सोनिया गांधी यांनी दिली असल्याचे चव्हाण यांनी म्हटले होते. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या बाहेर जाणार नसल्याचे म्हटले असून घटना हीच शिरोधार्य मानून घटनेच्या चौकटीत सरकार चालणार, अशी भूमिका घेतली, असा गौप्य्स्फोट चव्हाण यांनी नांदेडमधील एका कार्यक्रमात केला होता.
घटनाबाह्य काम करणार नाही, असे शिवसेनेकडून लिहून घेतले असून शिवसेने त्याच्याबाहेर काम केले तर सत्तेतून बाहेर पडू, असा इशाराच चव्हाण यांनी दिला होता. त्यावर एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण देत अशोक चव्हाणांच्या विधानावर संविधानाच्या चौकटीतून सरकार चालवण्यासाठी आम्ही बंधनकारक आहोत आणि तसंच सरकार चालणार आहे. किमान समान कार्यक्रमाशिवाय काहीही लिहून देण्यात आलेलं नाही, असे शिंदे यांनी सांगितले आहे.