मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यांची भेट घेत असत, असा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी टीका केल्यामुळे राऊत यांनी आपले विधान मागे घेतले. पण आता करीम लालाचे नातू सलीम खान यांनी करीम लालाची भेट फक्त इंदिरा गांधीच नाही तर माजी पंतप्रधान राजीव गांधी, राष्ट्रवादीचे शरद पवार आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे ही घेत असत. असा दावा करीम लालाचे नातू सलीम खान यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर गोंधळ निर्माण झाल्यानंतर केला आहे.
तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते की, काँग्रेस निवडणूक जिंकण्यासाठी अंडरवर्ल्डची मदत घेत होती. त्यावर सलीम खान यांनी नाराजी व्यक्त करत करीम लाला एक व्यापारी होते. त्यांच्या मनात पठाण समुदायासाठी आदर होता. राजकारणात जावं असं त्यांना कधीही वाटत नव्हतं. त्याच्याकडे एवढे पैसेही नवहते की, ते राजकीय पक्षांना निवडणुकीसाठी पैसे पुरवतील, असे सलीम म्हणाले. तसेच त्यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याची मोडतोड करून ते सादर केले असल्याचा दावाही केला.