बहुजननामा ऑनलाइन टीम – गेल्या काही दिवसांपासून नोरा फतेही(Nora Fatehi) इंडियाज बेस्ट डान्सर शोमध्ये दिसत असल्यानं चर्चेत येत होती. नुकतीच ती टेरेंस लुईस सोबतच्या एका व्हिडीओमुळं चर्चेत आली होती. नोरा(Nora Fatehi) तशीही आपल्या डान्स व्हिडीओमुळं कायमच चर्चेत असते. त्यामुळं चर्चेत येण्याची ही तिची काही पहिलीच वेळ नाही. नोरा आधीही एका व्हिडीओमुळं चर्चेत आली होती ज्यात नोरा कपडे विकताना दिसली होती. आता डान्स व्हिडीओमुळं पुन्हा नोरा सोशलवर चर्चेत आहे.
नोरानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती एका मित्रासोबत समुद्रकिनारी डान्स करताना दिसत आहे. नोरानं व्हिडीओ शेअर करताना लिहिलं की, माझा मित्रा मार्सनं मला समुद्रकिनारी डान्स शिकवण्याचा निर्णय घेतला.”
नोराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. अनेकांना तिचे ठुमके खूप आवडले आहेत. नोराचा लुकही खूप हॉट दिसत आहे. अनेकांनी डान्स आणि लुकचं कौतुक केलं आहे. परंतु काहींनी यावर मजेदार कमेंटही केल्या आहेत. एक युजरनं तिला प्रश्न केला की रामदेव बाबासोबत डान्स करतेय का ? नोराच्या डान्सवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडला असून अजूनही हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.
नोराच्या वर्कफ्रंटबद्दल बोालायचं झालं तर लवकरच नोरा अजय देवगण स्टारर भुज द प्राईड ऑफ इंडिया या सिनेमात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच ती स्ट्रीट डान्सर थ्री डी सिनेमात दिसली होती. नोरानं बॉलिवूडमध्ये अनेक आयटम नंबर केले आहेत. साकी साकी, दिलबर, एक तो कम जिंदगानी, कमरिया, गरमी हे तिचे आयटम साँग खूपच गाजले आहेत.