नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी इंडियन ऑइल कंपनीने एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ केली असून इंडियन ऑईलच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या दरांनुसार अनुदानित घरगुती गॅस सिलिंडर्सच्या किंमतीत १५० रुपयांनी वाढ झाली आहे. फेब्रुवारीपासून हे दर लागू होणार असून महानगरांमध्ये विना अनुदानित १४ किलो एलपीजी सिलिंडरची किंमत १४४.५० रुपये होती. ती वाढवून १४९ रुपयेपर्यंत आहे. याअगोदर १ जानेवारी २०२० रोजी घरगुती गॅसचे दर वाढवले होते.
दर महिन्याला सबसिडी आणि बाजार दर बदलत असून फेब्रुवारीच्या सुरूवातीला कोणतेही बदल केले गेले नव्हते. एलपीजीचे एकूण २७.६ कोटी ग्राहक असून त्यापैकी सुमारे दोन कोटींना अनुदान मिळत नाही.आयओसी वेबसाइटनुसार १४ किलो एलपीजी सिलिंडर दिल्लीत ८५८.५० रुपयात मिळणार असून दिल्लीत १४४.५० रुपयांनी किंमत वाढविण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवरचे दर आणि परदेशी चलन विनिमय दरानुसार एलपीजी दर ठरत असून यामुळेच सिलेंडर सबसिडीच्या दरात प्रत्येक महिन्याला बदल होतो. तसेच जेव्हा आंतरराष्ट्रीय वाढतो तेव्हा सरकार अधिक सबसिडी देते आणि जेव्हा दर कमी होतात तेव्हा सबसिडीमध्ये कपात होते. आयओसीच्या वेबसाइटवर जाऊन वर जाऊन https://indane.co.in/tarrifs_price.php वर क्लिक करा. तेथे, तुम्हाला Show All Market चा टॅब दिसेल. तुम्ही क्लिक करताच स्वयंपाकाच्या दरांशी संबंधित यादी खाली दिसेल.