बहुजननामा ऑनलाईन – कित्येकदा आपल्याकडील महत्त्वाच्या वस्तू चोरी होतात तर कधी कधी त्या आपल्या कडून विसरल्या जातात. या महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक कागदपत्र म्हणजे आधार कार्ड. आजकाल प्रत्येक सरकारी किंवा निमसरकारी प्रक्रियेत आधार कार्ड हे बंधनकारक झाले आहे. जर कधी अशा अनेक प्रसंगामध्ये तुम्हचा आधार कार्ड हरवलं असेल तर आता घाबरण्याची आवश्यकता नाही. आधार कार्ड हरवल्यास नवीन आधार कार्ड कसा मिळवावा हे जाणून घ्या.
जर तुमचे आधार कार्ड हरवले तर नवीन आधार कार्डसाठी आपल्याकडे आधारमध्ये नोंदणीकृत मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे.आधार कार्ड काढताना जो मोबाईल नंबर तुम्ही रजिस्टर केला असेल तो मोबाईल असणे आवश्यक आहे. आपल्या आधार कार्डमध्ये नोंदणीकृत मोबाइल नंबरच्या मदतीने आपण नवीन आधार कार्ड मिळवू शकता. जर काही कारणामुळे तो रजिस्टर नंबर बंद असल्यास चिंतेची बाब नाही. कारण त्याशिवायही तुम्ही नवीन आधार कार्ड मिळवू शकता.
सर्वप्रथम https://uidai.gov.in/ ही वेबसाईट उघडा. त्यानंतर तुमच्या उजव्या हाताला आधार प्राप्त करा या विभागात आधाराचे पुनर्निर्माणवर क्लिक करा. यावर तुम्हचा आधार नंबर, सेक्युरिटी कोड आणि request OTP बॉक्सवर क्लीक करा. यानंतर चालू मोबाईल नंबर टाका. त्या मोबाईल नंबरवर एक वन टाईम पासवर्ड येईल तो नंबर टाकून पुढे क्लीक करा. या नंतर तुम्हाला ५० रुपये ऑनलाईन पैसे जमा करावे लागतील. या नंतर आधार कार्डवर असणाऱ्या पत्यावर पोस्टाने आधार कार्ड येईल.