चंद्रपूर : बहुजननामा ऑनलाइन – जोपर्यंत समाज एकसंघ आहे तोपर्यंत तो समाज सर्वांना हवाहवासा वाटतो. अशा एकसंध समाजाची प्रगती कोणीही रोखू शकत नाही. मेरू शिंपी समाजाने शिंपी समाजातील सर्व घटकांना एकत्र आणले ही कौतुकास्पद बाब आहे. मेरू शिंपी समाजाला समाजहितासाठी जी मदत लागेल ती करण्यासाठी आपण सदैव सोबत आहोत, असे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
चंद्रपूर येथे पार पडलेल्या मेरू शिंपी समाजाच्या उपवर-वधू परिचय मेळावा व अधिवेशनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मेरू शिंपी समाज सुधार समितीचे अध्यक्ष संजय दिकोंडवार, सचिव विजय आक्केवार, जितेंद्र इजगिरवार, अशोक आक्केवार, राकेश कर्णेवार, अनिल दिकोंडवार, विजय गज्जलवार, अरुण चंदुरवार, रमेश वडपल्लीवार, अरुण कोत्रीवार, महेश गटलेवार, लक्ष्मीनारायण कल्लमवार, दामोधर गंधेवार, रेखा दिकोंडवार, साधन दिकोंडवार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.