बहुजननामा ऑनलाइन टीम – मुंबई लोकलमध्ये महिला प्रवासी लहान मुलांना सोबत घेऊन प्रवास करताना आढळल्या तर त्यांना आता प्रवासाला परवानगी दिली जाणार (only-women-passengers-no-
राज्यात अनलॉकच्या टप्प्यात राज्य सरकारने मुंबईच्या लोकलमधून महिलांना प्रवास करण्याची मूभा दिली होती. पण अनेक महिला आपल्या लहान मुलांसोबत प्रवास करत असल्याचे वारंवार समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई लोकलमधून केवळ महिलांना प्रवास करता येईल, त्यांच्यासोबत लहान मुलांना प्रवास करता येणार नाही, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
मुंबईत लोकलमध्ये सध्या महिला प्रवाशांसह अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची मूभा आहे. 17 ऑक्टोबरपासून महिलांच्या प्रवासाला परवानगी दिली होती. पण त्यासाठी काही वेळा ठरवून देण्यात आल्या होत्या. महिलांना सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत आणि संध्याकाळी 7 नंतर पुढे शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करण्याची परवानगी दिली आहे.