• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Mumbai News : ‘त्या’ पक्षांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे नाही; अफवा न पसरवण्याचे प्रशासनाकडून आवाहन

by ajayubhe
January 11, 2021
in मुंबई
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुंबईत (Mumbai ) कावळे, ठाण्यात बगळे व पोपट या पक्ष्यांचे मृत्यू झाल्याचे आढळून आले असले, तरी हे मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचे सिद्ध झालेले नाही. आता पर्यंत बर्ड फ्लू रोगामुळे पक्ष्यांचे मृत्यू झाल्याचे आढळून आलेले नाही, त्यामुळे रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज, अफवा पसरविण्यात येऊ नयेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जर कोणाला काही यासंदर्भात समस्या असेल तर पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून त्याची माहिती द्यावी. तसेच बर्ड फ्लू बाबत दक्षता घेणे आवश्यक आहे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

कोरोनानंतर बर्ड फ्लूमुळे देशात चिंतेचे वातावरण पसरले आहे. काही राज्यात निर्बंध लावू करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून ५ राज्यांतून बर्ड फ्लूने सुमारे २५ हजार देशी-विदेशी पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र्रात तशी परिस्थिती दिसत नसली तरी ठाण्यात १५ पाणबगळ्यांचा संशयास्पदरीतीने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या पक्ष्यांना कुठल्याही जखमा आढळून आल्या नाहीत. विशेष म्हणजे, मांजर, कुत्रे, कावळे यांनी या मृतदेहांना तोंडही लावले नाही. त्यामुळे गूढ वाढले आहे. याबाबत मुंबई पशुवैद्यक संस्था अधिक तपास करत आहे. त्यातून जे निष्पन्न होईल, तेव्हा मृत्यूचे खरे कारण उघड होईलच, परंतु निसर्ग अभ्यासक व पक्षीप्रेमी म्हणून आपण पक्षीनिरीक्षणासाठी जात असलेल्या जागांवर जर कोणतेही पक्षी मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडलेले दिसले, तर त्वरित वनविभागाला कळवा. या पक्ष्यांना न हाताळता सुरक्षित अंतरावरून त्यांचे फोटो काढा. बर्ड फ्लूबाबत नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन केल्याचे पर्यावरणमित्र रोहित जोशी यांनी सांगितले.

पशुसंवर्धन विभागाद्वारे घेतली जाणारी काळजी
दरवर्षी बर्ड फ्लू सर्वेक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो. या कार्यक्रमांतर्गत पक्ष्यांच्या घशातील द्रवांचे नमुने, विष्ठेचे नमुने, तसेच रक्तजल नमुने तपासणीसाठी गोळा करण्यात येतात. यांची तपासणी पश्चिम विभागीय रोगनिदान प्रयोगशाळा, पुणे या ५ राज्यांसाठी पशुरोग निदानाच्या शीर्षस्थ प्रयोगशाळेमध्ये तपासण्यात येतात. पोल्ट्रीधारक, सर्वसामान्य जनता यांना कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरित होणाऱ्या पक्ष्यांमध्ये मृत्यू झाल्याचे आढळून आल्यास, व्यावसायिक पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मृत्यू झाल्याचे निदर्शनास आल्यास, पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये याची माहिती द्यावी. मृत पक्ष्यांना हात लावू नये, शवविच्छेदन करू नये, त्यांची परस्पर विल्हेवाट लावू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

निर्बंध लागू नाहीत
बर्ड फ्लू सर्वेक्षण कार्यक्रम नियमित राबविण्यात येत आहे. अंडी व कुक्कुट मांस ७० अंश सेंटिग्रेड तापमानावर ३० मिनिटे शिजवून खाल्यास विषाणू निष्क्रिय होत असल्याने, अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे पूर्णतः सुरक्षित आहे. सध्या चिकन व अंडी यांच्या विक्रीवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध लागू करण्यात आलेले नाहीत.

घाबरण्याची परिस्थिती नाही
स्थलांतरित होणाऱ्या जंगली पक्ष्यांमध्ये, कावळ्यांमध्ये, परसातील कोंबड्यांमध्ये, व्यावसायिक स्तरावर कुक्कुटपालन करणाऱ्या ठिकाणावर बर्ड फ्लूचे सर्वेक्षण राबविण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. अद्याप वन्य व स्थलांतरित पक्ष्यांमध्ये, कावळ्यांमध्ये अथवा कोबड्यांमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग आढळून आलेला नाही. यामुळे मृत्यू झाल्याचे दिसून आलेले नसल्याने घाबरण्याची परिस्थिती नाही, असे प्रशासनाने सांगितले.

Tags: bird flumumbaiMumbai Newsno bird deaths due to bird flurumorsबर्ड फ्लू
Previous Post

राज्यात बर्ड फ्ल्युचा शिरकाव ! परभणीतील मुरुंबा गावात कोंबड्यांचा मृत्यु बर्ड फ्ल्युमुळेच

Next Post

अखेर महाराष्ट्रात ‘बर्ड फ्लू’ चा शिरकाव ! ‘त्या’ कोबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’नेच; अहवालात स्पष्टीकरण, परभणीत प्रतिबंध आदेश लागू

Next Post

अखेर महाराष्ट्रात 'बर्ड फ्लू' चा शिरकाव ! 'त्या' कोबड्यांचा मृत्यू 'बर्ड फ्लू'नेच; अहवालात स्पष्टीकरण, परभणीत प्रतिबंध आदेश लागू

Please login to join discussion
ताज्या बातम्या

‘स्टार्च हवंय विचारांना’ काव्यसंग्रह प्रकाशना प्रसंगीं वक्तृत्व शैलीतून मराठी भाषेचे महत्व दिले पटवून

January 24, 2021
0

मुरबाड : बहुजननामा ऑनलाईन - काव्य संमेलन म्हटले की कवीना आपल्या काव्य तुन जनजागृती, विचार मांडून आपल्या कवितेच्या माध्यमातून संकल्पना...

Read more

लोकसभा सचिवालयात 12 वी ते MBA उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी, 90 हजार पगार, जाणून घ्या

January 24, 2021

UP : परवान्याशिवाय मर्यादेपेक्षा जास्त दारू ठेवल्यास होणार कारवाई, 51000 ची द्यावी लागणार हमी

January 24, 2021

जातीनिहाय जनगणनेची पंकजा मुंडेंनी केंद्र सरकारला करुन दिली आठवण

January 24, 2021

Pimpri News : वैधानिक इशारा न छापलेल्या ‘उंची’ विदेशी सिगारेटचा साठा जप्त

January 24, 2021

BSNL 4G सिम कार्ड मिळतेय फ्री, जाणून घ्या ‘ऑफर’

January 24, 2021

वादग्रस्त वक्तव्यामुळे साक्षी महाराज पुन्हा चर्चेत, म्हणाले – ‘काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांची हत्या केली’

January 24, 2021

मोदी सरकार 19 कोटी EPF खातेधारकांसाठी करू शकतं मोठी घोषणा, जाणून घ्या कोणाला होईल फायदा

January 24, 2021

Pune News : पुण्याला हक्काचे 16 TMC पाणी मिळालेच पाहिजे – माजी आमदार मोहन जोशी

January 24, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

मुंबई

Mumbai News : ‘त्या’ पक्षांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे नाही; अफवा न पसरवण्याचे प्रशासनाकडून आवाहन

January 11, 2021
0

...

Read more

Pune News : शिरूरमध्ये वाळू सप्लाय करणाऱ्या मित्रांमध्ये भागीदारीतून वाद, मित्रानेच गोळ्या झाडून दुसऱ्या मित्राचा केला खून

6 days ago

ज्यो बायडन लवकरच भारतीयांना मोठी गुड न्यूज देणार !

5 days ago

काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरून पक्षात 2 गट, मुख्यमंत्री अन् राज्यसभा खासदार आमनेसामने

2 days ago

Tata Sky ची भन्नाट ऑफर ! 500 रुपयांचे रिचार्ज करा अन् टाटा टियागो कार जिंका

4 days ago

Nashik News : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा ‘मुहूर्त’ निश्चित

1 day ago

Pimpri News : दोन जुगार अड्यावरील छाप्यात पावणे चार लाखांचा मुद्देमाल जप्त

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat