Nitin Gadkari | अनर्थ टळला ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या ताफ्यातील कारचा अपघात; एक जखमी

nitin gadkari union minister nitin gadkaris convoy crashed driver car averted major disaster

नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – Nitin Gadkari | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या ताफ्यातील पायलट वाहनाचा शनिवारी रात्री 11 वाजता अपघात झाला. सुदैवाने यामध्ये एक जण किरकोळ जखमी झाला.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

शनिवारी रात्री 11 च्या सुमारास गडकरी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या रक्षकांच्या वाहनाचा ताफा सावरकर नगर चौकातून गडकरी यांच्या वर्धा मार्गावरील निवासस्थानाकडे जात होता. छत्रपती चौकात सिग्नल बंद झाल्यामुळे समोर धावणाऱ्या एका ट्रक चालकाने करकचून ब्रेक मारले. अचानक ट्रक थांबल्याने पाठीमागून येत असलेल्या ताफ्यातील पोलिसांच्या पायलट वाहनातील चालकाने प्रसंगावधान राखून बाजूने वाहन काढले. त्यामुळे ट्रकला कट लागून पायलट कारचे नुकसान झाले. चालकाला किरकोळ दुखापत झाली. मात्र चालकाने दाखवल्या प्रसंगावधानामुळे मागची सर्व वाहने सुरळीत पायलट वाहनाच्या मागे निघाली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, या अपघाताची धंतोली पोलीस किंवा नियंत्रण कक्षातून सविस्तर माहिती मिळू शकली नाही.

Web Title : nitin gadkari union minister nitin gadkaris convoy crashed driver car averted major disaster

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Anil Deshmukh | अनिल देशमुख यांना सीबीआयची क्लिन चिट? CBI च्या उपअधीक्षकांनाच वाटत नाही आरोपात तथ्य

Janmashtami | जन्माष्टमी 30 ला, जाणून घ्या केव्हापासून कुठपर्यंत असेल ‘अष्टमी तिथी’, पूजा विधी आधि शुभ मुहूर्त

Justice D Y Chandrachud | सोशल मीडियावर खोट्याचा (फेक न्यूज) बोलबाला, ‘प्रेस’ची निष्पक्षता सुनिश्चित व्हावी – सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश