बहुजननामा ऑनलाईन टीम : बलात्कार प्रकरणातील आरोपी आणि फरार घोषित झालेल्या नित्यानंदने पुन्हा एकदा असा दावा केला आहे की, ज्यानंतर तो चर्चेत आहे. स्वत: चा देश कैलासा बनविण्याचा दावा करणाऱ्या नित्यानंदने आपल्या ताज्या निवेदनात आपल्या देशासाठी व्हिसा जाहीर केला आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये नित्यानंदने दावा केला आहे की, कैलासा येथे येण्यासाठी त्याच्याकडे स्वत: ची चार्टर्ड फ्लाइट सर्व्हिस आहे, जेणेकरुन लोक कैलासाला येऊ शकतील. मात्र, येथे येणार्या व्यक्तीस केवळ तीन दिवस राहण्याची परवानगी आहे.
नित्यानंदने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, कैलासा येथे येण्यासाठी ऑस्ट्रेलियाहून विमान घ्यावे लागेल. अशा परिस्थितीत नित्यानंदच्या या स्वयंघोषित देशाचे स्थान जवळपास असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या प्रवासात परम शिवचे दर्शन देखील केले जाईल, असा दावा केला जात आहे.
https://twitter.com/VishweshwarBhat/status/1339476517651267584
दरम्यान, बलात्काराचा आरोपी नित्यानंदने गेल्या वर्षीच देश सोडून पलायन केल्यानंतर आपला देश कैलासा बनवण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून नित्यानंदने आपल्या व्हिडिओमध्ये कैलासाशी संबंधित बरीच माहिती दिली आहे, ज्यात त्याने स्वतःचे चलन, रिझर्व्ह बँक आणि इतर सर्व सुविधा असल्याचा दावा केला आहे.
नित्यानंदने कैलासामध्ये त्यांचे सरकार, मंत्री, मंत्रालयासह अनेक सुविधा असल्याचा दावा केला आहे. नित्यानंदला भारतात पळकूटा म्हणून घोषित केले असले तरी बहुतेक वेळा त्याच्या व्हायरल व्हिडिओंमुळे तो चर्चेत असतो.