नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सिंधुदुर्गातील शिवसेना (Sindhudurg Shivsena) कार्यकर्ता संतोष परब (Santosh Parab) यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी (Attack Case) भाजपचे नेते आणि आमदार (BJP MLA) नितेश राणे (Nitesh Rane) यांना सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दणका दिला आहे. सुप्रीम कोर्टात आज झालेल्या सुनावणीत कोर्टानं नितेश राणे (Nitesh Rane) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज (Pre-Arrest Bail Application) फेटाळून लावला असून त्यांना येत्या 10 दिवसात जिल्हा न्यायालयासमोर (District Court) शरण (Surrender) येण्याचा सल्ला दिला आहे.
- Dhananjay Munde | केज नगर पंचायतीत धनंजय मुंडेंना जोरदार धक्का; भाजप काँग्रेसच्या साथीने करणार सत्ता स्थापन
- Shweta Tiwari Controversial Statement | श्वेता तिवारीनं केलं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाली – ‘माझ्या ब्रा ची साईज..’ (व्हिडिओ)
नितेश राणे (Nitesh Rane) यांचा सिंधुदुर्ग न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) धाव घेतली. परंतु मुंबई उच्च न्यायालयानेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर नितेश राणे यांनी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. सुप्रीम कोर्टात ज्येष्ठ विधिज्ञ मुकूल रोहतगी (Senior Lawyer Mukul Rohatgi) यांनी नितेश राणे यांची बाजू मांडली. यात राज्य सरकार (State Government) सूडबुद्धीनं त्यांच्यावर कारवाई करत असल्याचा दावा केला. परंतु सरकारी वकिलांनी (Government Prosecutor) सर्व दावे फेटाळून लावत नितेश राणे यांच्याविरुद्ध याआधीच अनेक आरोप आहेत. संबंधित प्रकरणात नितेश राणे यांचा सहभाग असल्याचे पुरावे आहेत. याचा राजकीय सूडाचा प्रश्नच नाही, असा प्रतिदावा सरकारी वकिलांनी केला.
#SupremeCourt bench headed by CJI NV Ramana to shortly hear Maharashtra BJP leader Nitesh Rane's plea challenging Bombay HC order denying him anticipatory bail in attempt to murder case @BJP4India @NiteshNRane pic.twitter.com/ycmiGjZmsp
— Bar & Bench (@barandbench) January 27, 2022
यानंतर सुप्रीम कोर्टानं केलेल्या सुनावणीत नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. मात्र, त्याचवेळी त्यांना जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्यासाठी 10 दिवसांची मुदत दिली. यानुसार पुढील 10 दिवस पोलीस नितेश राणे यांना अटक (Arrest) करु शकत नाही. शरण झाल्यानंतर नितेश राणे नियमित जामिनासाठी अर्ज करु शकतात. त्यामुळे नितेश राणे यांच्यासमोर आता जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निकालनंतर नितेश राणे काय पाऊल उचलणार हे पहावं लागणार आहे.
Web Title : Nitesh Rane | supreme court grants 10 days protection from arrest to maharashtra bjp mla nitesh rane and directs him to surrender before the trial court
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Rashmi Uddhav Thackeray | रश्मी ठाकरे यांच्याकडून राष्ट्रध्वजाचा अवमान?; लोकायुक्तांकडे तक्रार दाखल
Cough Problem | सतत होत असेल खोकला तर चुकूनही करू नका दुर्लक्ष, जीवघेणे असू शकते कारण
Mayor Murlidhar Mohol | महापौर मुरलीधर मोहोळ यांना पुन्हा एकदा ‘कोरोना’चा संसर्ग