कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाइन – Nitesh Rane On Sanjay Raut | भाजपचे आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. “उद्धव आणि राज ठाकरे यांच्यात आग लावणाऱ्या संजय राऊत यांची आता छत्रपतींच्या घरातही आग लावण्यापर्यंत मजल गेली,” असा आरोप नितेश राणे यांनी केला. सोमवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
त्यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले, “राऊत यांचा आग लावण्याचा धंदा आहे. उद्धव आणि राज यांच्यात त्यांनीच भांडणे लावली. त्यानंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी राऊतांची गाडीही जाळली होती. या दोन भावांमध्ये भांडणे लावल्यानंतर आता ते छत्रपती घराण्यातही आग लावत आहेत. दहा मिनिटे त्यांचे सुरक्षा रक्षक बाजूला काढा आणि मग मराठा समाजाने त्यांचा ताबा घेतला पाहिजे,” असं ते म्हणाले.
पुढे नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना टोला लगावला आहे. ”अयोध्येला जाणार म्हणणाऱ्या फक्त लहान मुलांची काळजी घेतली पाहिजे,” असं ते म्हणाले. तसेच, “पाठित खंजीर खुपसून, देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) फसवून नगरपालिका असेल किंवा राज्यात सत्तेत लोक बसले आहेत.
सेना भाजपचं सरकार सत्तेत येईल, त्याला तुम्ही मोदींचा फोटो लावा, तुमचा फोटो लावा आणि एकत्र राज्य आणू असा शब्द उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना दिला. सत्ता आल्यानंतर शब्द न पडू देणारे मुख्यमंत्री राज्यात बसलेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीनं ते मुख्यमंत्री झाले आणि अडीच वर्ष ते राज्य करतायत,” असा घणाघातही त्यांनी केला.
Web Title :- Nitesh Rane On Sanjay Raut | bjp leader nitesh rane targets shiv sena leader sanjay raut said fight between uddhav raj thackeray sambhaji raje chatapati
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हे देखील वाचा :
Hair Care Tips | Summer मध्ये आपल्या केसांचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आत्ताच ‘या’ सवयी लावून घ्या
Belly Fat | पोटाची चरबी कमी करायची असेल तर करू नका ‘ही’ गोष्ट; जाणून घ्या
Heart Attack | पुर्वी दिसतात ‘हे’ 6 लक्षणे, चुकून देखील दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या