Nitesh Rane News | नितेश राणेंना वादग्रस्त वक्तव्य भोवलं

September 3, 2024

अहमदनगर: Nitesh Rane News | रामगिरी महाराजांच्या (Ramgiri Maharaj) समर्थनार्थ अहमदनगरमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात हिंदू समाजातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर नितेश राणेंनी सभेत मुस्लिमांना उघडपणे धमकी दिली. ते म्हणाले, ‘आमच्या रामगिरी महाराजांविरोधात कोणी काही बोलले तर आम्ही मशिदींमध्ये घुसून एकेकाला मारू,’ अशी खुली धमकीच त्यांनी दिली होती.

यांनतर मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी काल (दि.१) रात्री उशिरा भाजप नेते नितेश राणे यांच्याविरोधात अहमदनगरच्या तोफखाना पोलिसात (Tofkhana Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर येथे सकल हिंदू समाजाच्या (Sakal Hindu Samaj) वतीने महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मोर्चाच्या समारोपाच्या भाषणात मुस्लिम समाजाला धमकवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या मोर्चादरम्यान नितेश राणे म्हणाले, माझा इतिहास सर्वांना माहिती आहे. दाऊद इब्राहिमला आव्हान देणाऱ्यांपैकी हे राणे कुटुंबीय आहे. बाकी कोणातच हिंमत नव्हती. माझे वडील जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ६३ एन्काउंटर करण्याचा आदेश देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा मी मुलगा आहे.

हिंमतीने सर्व करा, कुणी काय इथे करू शकत नाही. आपल्या जिभेला काही हाड नाही. पाहिजे तेव्हा मी बोलतो त्यांच्यासमोर मी जाऊन बोलतो. मला पाहून दरवाजे खिडक्या बंद करतात जसं काय गब्बर आलाय, मी हिंदूंचा गब्बर आहे हे लक्षात ठेवा, असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले.