मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – पूजा चव्हाण बद्दल आवाज उचलल्यावर आमच्या सहकाऱ्यांना धमकीचे फोन येत आहेत. एखादा कॉल मलाही टाकाना असं खुलं आवाहन भाजप आमदार नितेश राणे यांनी केलं आहे. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी धमकीचे फोन आल्याची तक्रार केली आहे. त्यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
https://twitter.com/ChitraKWagh/status/1360911803098689536?s=20
नितेश राणे यांनी ट्विट करत लिहिलं की, पूजा चव्हाण बद्दल आवाज उचलल्यावर धमकीचे फोन येत आहेत आमच्या सहकाऱ्यांना. एखादा कॉल मलाही टाकाना. मला पण बघू दे शिवसेनेत कोण मर्द उरला आहे. वाट बघतो आहे.
https://twitter.com/NiteshNRane/status/1361215074225037313?s=20
काय म्हणाले नितेश राणे ?
एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना नितेश राणे म्हणाले, मला फोन येत नाही याचं दु:ख झालं आहे. मलाही फोन करा. मलाही बरं वाटेल. माझा नंबरही देतो. घ्या फोन करा. फोन आला तर बाकीच्या गोष्टींवर मीही बोलू शकतो ना. एका मुलीला न्याय देण्यासाठी आमचा पक्ष जबाबदारी म्हणून पुढं येत आहे. सरकार न्याय देत नाही असंही ते म्हणाले.
All the Congress and Shiv Sena leaders busy tweetin about #DishaRavi but they don’t want to utter a word abt this young girl Puja Chavan from Beed who died a mysterious death n their own minister is the prime suspect!
Is it not cool enough to trend?
Hypocrites!— nitesh rane (@NiteshNRane) February 15, 2021
आणखी ट्विट मध्ये त्यांनी लिहिलं की, काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते दिशा रवी बद्दल ट्विट करण्यात व्यस्त आहे. मात्र बीडच्या पूजा चव्हाण या तरुणीच्या संशयास्पद मृत्यूविषयी एक चकार शब्दही त्यांना काढायच नाही. त्यांचा मंत्री या प्रकरणात मुख्य संशयित आहे. दुटप्पी भूमिका असं म्हणत त्यांनी काँग्रेस शिवसेनेवर टीकाही केली आहे.