नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका वृत्तसंस्थेशी बोलताना निर्भयाची आई आशा देवी यांनी दिल्ली विधानसभा निवडणुक लढवणार असल्याची बातमी चुकीची असून त्यासंदर्भात कोणाशीही बोलले नसल्याचे सांगितले. त्यांना राजकारणात रस नसून त्यांना फक्त आपल्या मुलीसाठी न्यायाची गरज असल्याचे आशा देवी यांनी स्पष्ट केले. याअगोदर आशा देवी या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध विधानसभा निवडणूक लढवू शकतात, अशी बातमी पसरली होती.
काँग्रेसच्या नेत्या कीर्ती आझाद यांनी ट्विट करत आशा देवी यांनी राजकारणात प्रवेश केल्याबद्दल अभिनंदन केले होते. यामुळेच त्या निवडणूक लढवू शकतात आणि लवकरच त्याची घोषणा होऊ शकते, अशा माहितीवर विश्वास ठेवला जात होता. पण एकीकडे काँग्रेसकडून आशा देवी यांच्या निवडणूक लढवण्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
"ऐ मां तुझे सलाम"
आशा देवी जी आपका स्वागत है https://t.co/XovQXVsLp9— Kirti Azad (@KirtiAzaad) January 17, 2020