मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – पंजाब नॅशनल बँकेच्या १४ हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरण उघडकीस येताच भारतातून पळून गेलेल्या नीरव मोदीला आज पीएमएलए कोर्टाने विशेष प्रतिबंधक कायद्यानुसार फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केले आहे. तसेच नीरव मोदी यांची संपूर्ण मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. दरम्यान, फरार असलेल्या नीरव मोदीला या बँकेनेच बेकायदा मदत केली असल्याचे फॉरेन्सिक ऑडिटमधून उघड झाले होते.
पीएनबी बँकेच्या घोटाळ्याचा तपास सीबीआयमार्फत सुरू आहे. बेल्जियममधील प्रख्यात बीडीओ या ऑडिट कंपनीकडे फॉरेन्सिक ऑडिटचे काम सोपविण्यात आले होते. त्याअंतर्गत पीएनबीला आतपर्यंत ५ अंतरिम व एक अंतिम अहवाल देण्यात आला आहे. ज्यात या बेकायदा हमीपत्रांचा उल्लेखदेखील आहे. त्यात पीएनबीने २८ हजार कोटी मूल्याची १५६१ हमीपत्रे नीरव मोदीला दिली असल्याचे दिसून आले. त्यापैकी तब्बल २५ हजार कोटी रुपयांची १,३८१ हमीपत्रे बेकायदेशीर पद्धतीने दिली होती. तसेच, पीएनबीने ज्या २३ जणांच्या नावे ही हमीपत्रे तयार केली होती, त्यातील २१ जण नीरव मोदीच्या थेट संबंधांतील होते. त्यातील १९३ हमीपत्रांचा गैरवापर केल्याचे या फॉरेन्सिक अहवालातून स्पष्ट झाले.
Mumbai: Nirav Modi has been declared a fugitive economic offender under Fugitive Economic Offenders Act by the special Prevention of Money Laundering Act ( PMLA) court today in Punjab National Bank scam case. Order on confiscation of his properties will happen later pic.twitter.com/Uk621OICpx
— ANI (@ANI) December 5, 2019
हा अहवाल अमेरिकेतील इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव जर्नालिस्ट या संस्थेने मिळविला आहे. ज्यामध्ये नीरव मोदीच्या भारतातील २० मालमत्तांचा उल्लेख आहे, मात्र विशेष बाब म्हणजे यापैकी कोणतीही मालमत्ता कर्जासाठी तारण म्हणून ठेवण्यात आली नसल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, बीडीओ कंपनीने आपल्या अहवालात नीरव मोदीकडील १५ महागड्या कार्स, एक बोट, १0६ अत्यंत महाग अशी पेटिंग्ज आदींचा उल्लेख केला आहे. ज्यात एम. एफ. हुसैन, राजा रवी वर्मा, जामिनी रॉय यांच्या कलाकृतींचा समावेश आहेत. या सर्वांची किंमत सुमारे २० कोटी रुपये आहे.
Visit : bahujannama.com