बहुजननामा ऑनलाईन– निफाड येथील तहसील कार्यालयात महाराष्ट्रात प्रदेश भाजप महिला मोर्चा अध्यक्षा उमा खापरे यांच्या अध्यक्षतेखाली आघाडी सरकारच्या विरोधात आक्रोश आंदोलन करण्यात आले.नाशिक जिल्ह्याचे आक्रोश आंदोलन खासदार भारती पवार आणि महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सुवर्णा जगताप यांच्या नेतृत्वाखाली निफाड तहसील येथे करण्यात आले.
महाराष्ट्रात ठिकठिकाणी महिलांवर होणारे अत्याचार,कोरोना विलगिकरन केंद्रात महिलांवर होणारे अत्याचार,बलात्कार हे सर्व रोखण्यासाठी राज्य सरकारने लवकरात लवकर कायदा करण्यात यावा. कोवीड उपचार केंद्रामध्ये स्वतंत्र महिला सुरक्षा कर्मी ,महिला परिचारिका यांची नेमणूक करण्यात यावी.तसेच महिलांच्या सतत होणाऱया अत्याचाराविरुद्ध कडक कायदे करण्यात यावेत यासाठी भाजपा महिलांनी आक्रोश आंदोलन करत सदरचे निवेदन उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना देण्यात आले.
यावेळी जिल्हा संघटन सरचिटणीस सुनील बच्छाव,शंकरराव वाघ,सतीश मोरे,सुनील जाधव, रवी गंगोले,विष्णू ढोमसे,सुनील जाधव, संजय गजरे, रवी सानप, आदेश सानप,शरद कासट, सारिका डेर्ले ,मोनिका वाघ,मीना बिडकर,स्वाती गाजरे,सुरेखा कुशारे,ज्योती शिंदे, मंजुश्री निकम,महेश गिरी,प्रशांत घोडके,डॉ उमेश काळे,अल्पेश पारख,प्रशांत घोडके,भक्ती गायकवाड,अरबाज पठाण, प्रदीप कापसे,बीरजू पठाण आदी महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.