पंढरपूर : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील सत्तास्थापनेसाठीचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. आपल्या पक्षाच्या आमदारानी पक्षांतर करू नये यासाठी काँग्रेस आणि शिवसेनेने काळजी घेतली आहे. मात्र, यादरम्यान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे ९ आमदार आपल्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट निंबाळकर यांनी केला आहे. राज्यातील विधानसभा निवडणूक होऊन अनेक दिवस उलगडून गेले तरी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी सरकार स्थापन करू शकली नसल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट सुरू झाली. सत्ता स्थापन करण्यासाठी आता विरोधी विचारधारा असलेले पक्ष एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत. तसेच आमदार फुटण्याचीही भीती राजकीय पक्षांना आहे. त्यात आता राष्ट्रवादीचे ९ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा निंबाळकरांच्या वक्यव्यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माढ्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकारणात काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर दुसरीकडे नारायण राणे यांनी बहुमत सिद्ध करणार असल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले कि, बहुमतासाठी फक्त १४५ चा आकडा हवा आहे. तो मी आणेन. त्यामुळे राणेंच्या विधानामुळेही भाजपमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असल्याचं समोर येतं.
तसेच राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीवर भाजपचे केंद्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले कि, मी आणि पंतप्रधान कायम म्हणत आलो आहोत कि, जर भाजप आणि शिवसेनेची महायुती विधानसभेमध्ये विजयी झाली तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. त्यावेळी कोणीही आक्षेप घेतला नाही. मात्र आता अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाची मागणी केली जात असल्याच अमित शहा यांनी म्हंटल आहे. तसेच राज्यपालांनी सरकार स्थापन करण्यासाठी १८ दिवस वेळ दिला. सर्व पक्षांना पुरेसा वेळ देण्यात आला. ज्यांना सरकार स्थापन करायचं आहे त्यांच्याकडे आजही वेळ आहे’ असं अमित शहा म्हणाले आहेत.
Visit : bahujannama.com