Nilesh Ghaiwal News | पुण्यातील निलेश घायवळ प्रकरण : कुटुंबातील सदस्यांच्या पासपोर्टचीही पोलिस चौकशी
पुणे : Nilesh Ghaiwal News | कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर आता पुणे पोलिसांनी निलेश घायवळच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू करण्याची तयारी केली आहे. विशेषतः घायवळची पत्नी आणि मुलगा यांनी पासपोर्ट मिळवण्यासाठी कोणतेही फेरफार केले का, याबाबत तपास सुरू आहे.
प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडून पोलिसांना घायवळच्या पासपोर्टसंदर्भात महत्त्वाची माहिती मिळाल्याचे कळते. २०१९ मध्ये बँक खाते उघडण्यासाठी दिलेल्या रहिवासी पुराव्यांचा आधार घेत घायवळने पासपोर्ट मिळवला होता, अशी नवी माहिती तपासात उघड झाली आहे.
या प्रकरणात खोटा पासपोर्ट मिळवण्याच्या शक्यतेवरून आजच गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



Comments are closed.