कौतुकास्पद ! बस कंडक्टर पास झाला UPSC ची मुख्य परिक्षा, आता पुढचा थांबा IAS
बंगळूर : वृत्तसंस्था – बंगळूर येथील एक बस कंडक्टर UPSC ची मुख्य परीक्षा पास झाला असून त्याचे नाव मधू एनसी असे आहे. ध्येयाने पछाडलेली माणसे कधीच हार मानत नाहीत. हेच मधुने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. मधू हा बीएमटीसीच्या बसमध्ये कंडक्टर म्हणून काम करत असून त्याच अधिकारी होण्याचे स्वप्न होत. ते त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं. त्यामुळेच मधू आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकला. आता ‘आयएएस’ होण्यासाठी त्याचा फक्त एकाच स्टॉपचा प्रवास बाकी आहे.
मधू हा बंगळूर मेट्रोपोलोटिन ट्रान्सपोर्ट सेवेत कंडक्टर असून त्याने नुकतेच यूपीएससीची मुख्य परीक्षा पास केली असून त्याला आता फक्त एकच टप्पा पार करायचा आहे. यूपीएससी परीक्षेसाठीची मुलाखत २५ मार्च रोजी घेतली जाणार आहे. जानेवारी मध्ये लागलेल्या परीक्षेच्या निकालपत्रात मधुने आपला क्रमांक पहिला तेव्हा त्याला अत्यंत आनंद झाला. २९ वर्षीय मधू हा बीएमटीएसमध्ये बस कंडक्टर म्हणून काम करत असून तो कुटुंबातील सगळ्यात मोठा मुलगा असल्याने त्याच्यावर घराची जबाबदारी आहे. मागच्या वर्षी जूनमध्ये मधुने यूपीएससीची परीक्षा दिल्यानंतर त्याचा निकाल ऑक्टोबर मध्ये लागला होता. त्यांनतर त्याने मुख्य परीक्षेची तयारी सुरु केली. राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय विषय, मूल्य, भाषा, सामान्य ज्ञान, गणित आणि निबंध लेखन या विषयांचा अभ्यास करत असून रोजच्या दिवसातील ५ तास तो यासाठी देतो. त्याने पूर्व परीक्षा मातृभाषा कन्नडमधून आणि मुख्य परीक्षा इंग्रजीतून दिली आहे.
कर्नाटकमधील मंड्या जिल्ह्यातील मालावली या छोट्या खेड्यात राहत असून वयाच्या १९ व्या वर्षी बस कंडक्टर होऊन आपल्या परिस्थितीशी दोन हात केले. त्याने आपली राज्यशास्त्राची पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. माझ्या घरातून सर्वाधिक शिक्षण घेतलेला मीच असून मी कोणती परीक्षा पास केली, याबद्दल माझ्या आई-वडिलांना काहीच माहित नाही. पण मी कुठलीतरी परीक्षा पास केली आहे, याचा त्यांना खूप आनंद झाला आहे, असे त्यांनी सांगितले. सी शिखा या बंगळूर मर=एट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट सर्व्हिसचे व्यवस्थापकीय संचालक यांच्यासारखा मोठा अधिकारी व्हायचे आहे, असे मधू परीक्षा पास केलेला रोल नंबर दाखवताना सांगितले. शिखा या त्यांच्या कामात व्यस्त असल्या तरी मधूला दिवसातून दोन तास देतात. या दोन तासात त्या मधूला मुलाखतीची तयारी कशी करायची याचे मार्गदर्शन करतात. तसेच शिखा या खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत असल्याचे मधू यांनी सांगितले.
Visit : bahujannama.com
Comments are closed.