नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुढच्या महिन्यापासून सणासुदीचा हंगाम सुरू होत आहे. अशा परिस्थितीत ऑक्टोबरमध्ये इतर महिन्याच्या तुलनेत कार्यालय आणि बँकांमध्ये अधिक सुट्या असणार आहे. त्यात या महिन्यात दसरा आणि दिवाळी दोन्ही सण येत आहेत. यामुळे या महिन्यात बँक व सरकारी कार्यालयांमध्ये सर्वाधिक सुट्टी आहे. ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक ११ दिवस बँका बंद असतील. म्हणजेच केवळ २० दिवस बँक कार्यरत असतील.
२ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती असल्याने पहिली सुट्टी २ ऑक्टोबरला पडत आहे, यानंतर राम नवमी आणि दसऱ्यामुळे बँकांना ७ आणि ८ ऑक्टोबरला सुट्टी असेल. यापूर्वी, ६ ऑक्टोबर रोजी रविवारी आहे, त्यामुळे बँका सलग ३ दिवस बंद राहतील. तसेच १२ ऑक्टोबर हा महिन्याचा दुसरा शनिवार आणि १३ ऑक्टोबर हा रविवार असल्याने या वेळी दोन दिवस बँका बंद राहतील. २० ऑक्टोबरला देखील रविवारी असल्याने बँका बंद राहतील.
दिवाळीत बँकांमध्ये चार दिवसांची सुट्टी असेल. २६ ऑक्टोबर रोजी चौथा शनिवार आणि २७ ऑक्टोबर रोजी रविवार आहे. दिवाळीही रविवारी आहे. भाऊबीज २९ ऑक्टोबरला आहे. तर गोवर्धन पूजेनिमित्त २८ ऑक्टोबरला सुट्टी असणार आहे. त्याचप्रमाणे नोव्हेंबर २०१९ मध्ये रविवार ३, १०, १७ आणि २४ नोव्हेंबरला आणि दुसरा शनिवार ९ आणि २३ नोव्हेंबरला आहे. गुरु नानक जयंती १२ नोव्हेंबरला येत आहे, त्या दिवशी देखील बँका बंद असतील.
Visit : bahujannama.com