अकोला : बहुजननामा ऑनलाईन – अकोला येथे जिल्हा परिषदेची निवडणूक झाली असून वंचित आघडी सत्तेवर येणार असल्याची चर्चा आहे. अकोल्यातील ५६ जागांचे निकाल लागले असून वंचितला सर्वाधिक म्हणजे २२ जागा मिळाल्या आहेत. तसेच चार अपक्ष उमेदवारही वंचित सोबत येण्याची शक्यता दर्शविली जात आहे. अकोल्यात काँग्रेसला ७ जागा, राष्ट्रवादीला ३, शिवसेनेला ४ अशा जागा मिळाल्या आहेत. तर अपक्षला ३ जागा मिळाल्या असून भाजपला ५६ पैकी ३९ जागा मिळाल्या आहेत. आंबेडकरांचा वंचित आघाडी हा सर्वात मोठा पक्ष असून आता सत्तास्थापनेसाठी आंबेडकर कोणाची साथ देणार याबाबत चर्चा रंगली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणूक होत असून काही ठिकाणी महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. तसेच नागपूरमध्ये नितीन गडकरींना जोरदार धक्का देत काँग्रेसचे महेंद्र डोंगरे यांनी विजय प्राप्त केला आहे. पालघरमध्येही जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा निकाल लागला असून शिवसेनेने बाजी मारत १८ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. तर धुळे जिल्हा परिषदेत भामरे आणि रावल यांच्या नेतृत्वाखाली भाजपने विजय मिळवला आहे. धुळ्यात भाजपने ३९ जागांवर बाजी मारली असून शिवसेनेला ४, काँग्रेसला ७, राष्ट्रवादीला ३ आणि अपक्षांना ३ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी जेसीबीने गुलाल उधळत जल्लोष साजरा केला आहे.