जळगाव : बहुजननामा ऑनलाइन – जळगाव जिल्हा अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेची शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून यात जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मालपुरे, जिल्हा उपाध्यक्षपदी अजय कोतकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
ही निवड संस्थापक अध्यक्ष सुनील नेरकर, प्रदेशाध्यक्ष सुरेश शिरोडे, राष्ट्रीय संघटक दीपक येवले यांनी केली. तसेच राज्य कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यात प्रदेशाध्यक्ष नंदलाल धांडे (नाशिक), निवड समिती (राज्यप्रतिनिधी) गिरीश रामचंद्र वाणी, प्रदेश खजिनदार पारोळा बापूराव वाकलकर,राज्य सदस्यपदी विजय पाखले,स्वप्नील भोकरे जळगाव, किशोर शिरोडे तर जळगाव जिल्हा कार्यकारिणीत जिल्हाध्यक्ष डी. बी. मालपुरे (चाळीसगांव),मुख्याध्यापक पिंपळगाव हरेश्वर कार्याध्यक्ष- शशिकांत महालपुरे (पाचोरा),मुख्याध्यापक राष्ट्रीय विद्यालय कोषाध्यक्ष- सी. सी. वाणी (चाळीसगांव), पी. के. सोनजे (मुख्याध्यापक एन.ई.एस. माध्यमिक), उपशिक्षक, उपाध्यक्षपदी अजय कोतकर(चाळीसगाव),उपाध्यक्ष नीलेश दुसे (जळगाव), मुख्यसंघटक दीपक शिनकर (पारोळा), संघटक चंद्रशेखर वाणी (धरणगाव) ,संघटक सुनील वाणी, संघटक अमोल येवले (चाळीसगाव), निलीमा दशपुते (पारोळा), स्वाती मोराणकर (भडगाव) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.