नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्हाला विवोचे स्मार्टफोन्स आवडत असतील आणि तुम्ही मोबाईल घेण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी आजचा दिवस भन्नाट ऑफर घेऊन आला आहे. अॅमेझॉन वर सध्या सेल सुरु आहे. या सेलमध्ये विवोच्या काही प्रसिद्ध मोबईल फोन्सवर जबरदस्त ऑफर्स दिल्या जात आहेत. हा सेल १३ फेब्रुवारी म्हणजेच केवळ आजपर्यंतच सुरु राहणार आहे. एवढेच नाही तर ICICI बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डवरून फोन खरेदी केल्यास ग्राहकांना १५०० रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट मिळणार आहे.चला पाहूया काय आहेत ऑफर्स
विवो V17 प्रो
– विवोच्या या स्मार्टफोनवर १५ टक्के सूट दिली जात आहे.
– सूट मिळाल्यानंतर या फोनची किंमत २७ हजार ९९० रुपये झाली आहे.
– ८ जीबी रॅमे असलेल्या या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा क्वॉड एवन कॅमेरा देण्यात आला आहे.
विवो S1 प्रो
– २० हजार ९९० रुपये किंमत असलेला हा फोन ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजचा आहे.
– हा फोन १९ हजार ९९० रुपयांत खरेदी करण्याची संधी आहे.
– या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. फोन एक्सचेंज ऑफरमध्ये खरेदी करण्याची संधी आहे.
विवो V15 प्रो
– पॉप अप सेल्फी कॅमेऱ्याचा असलेल्या या फोनवर १० हजार रुपयांची सूट दिली जात आहे.
– डिस्काउंट नंतर ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेजचा फोन १९ हजार ९९० रुपयात खरेदी करता येऊ शकतो.
– एक्सचेंज ऑफर केल्यास ३ हजारांचा अतिरिक्त डिस्काउंट दिला जाणार आहे.
विवो U10
– गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेला विवोचा हा बजेटमधील स्मार्टफोन ८ हजार ९९० रुपयात खरेदी करता येऊ शकतो.
– फोन खरेदी केल्यास युजर्संना १५०० रुपयांचे अॅमेझॉन कूपन दिले जात आहे.
– फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन 665AIE प्रोसेसर दिला जात आहे.
विवो U20
– विवोचा ४ जीबी रॅम असलेला हा फोन १० हजार ९९० रुपयात खरेदी करता येवू शकतो.
– तर ६ जीबी रॅमचा फोन ११ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येवू शकतो.
– तसेच युजर्संना फोन खरेदीनंतर १००० रुपयांचे अॅमेझॉन कूपन दिले जाणार आहे.