हिंजवडी : पोलीसनामा ऑनलाइन – दोन सराईत वाहन चोरट्यांना अटक करून हिंजवडी पोलिसांनी ५ लाख १५ हजार रुपये किंमतीच्या १५ दुचाकी जप्त केल्या आहेत. पोलिसांनी ९ गुन्हे उघडकीस आणले असून आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्याता आहे. ही कारवाई हिंजवडी परिसरात करण्यात आली.
आमिन मेहबुब शेख (वय-२२ रा. पिंपळे निलख) आणि रियाझ सिंकंदर शेख (वय-२२ रा. भुकुम ता. मुळशी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हिंजवडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी हद्दीमध्ये गस्त घालत असताना सायंकाळी चार च्या सुमारास आमिन आणि रियाझ संशायास्पद आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान त्यांनी दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याचे कबुल केले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून ५ लाख १५ हजार रुपये किंमतीच्या १५ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींनी हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५, भोसरी १, चतु:श्रृंगी २ आणि चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ वाहन चोरी केल्याचे तपासात उघड झाले आहे. उर्वरीत वाहन चालकांचा शोध हिंजवडी पोलीस घेत आहेत.
हि कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त अश्वीनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक अनिरुद्ध गिजे, वरुडे, पोलीस कर्मचारी महेश वायबसे, किरण पवार, विवेक गायकवाड, कुणाल शिंदे, आतिक शेख, हनुमंत कुंभार, सुभाष गुरव, विकी कदम, चंद्रकांत गडदे, झनक गुमलाडू, श्रीकांत चव्हाण, अमर राणे, आकाश पांढरे, अली शेख यांच्या पथकाने केली.