पुणे : बहुजननामा ऑनलाईन – मागस प्रवर्गाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण दिले गेले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आरक्षणाला वैध ठरविल्यानंतर आता आरक्षणाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. मराठा समाजाला १६ टक्क्यांऐवजी १२ ते १३ टक्के आरक्षण देण्यात यावे असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे राज्यातील आरक्षणाचा टक्का वाढलेला आहे.
राज्यात कोणत्या समाजाला किती टक्के आरक्षण ?
खालीलप्रमाणे
१. इतर मागासवर्ग (OBC) – १९ टक्के
२. शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्ग ( SEBC) – १६ टक्के ( १२ ते १३ टक्के करण्याचा न्यायालयाचा निकाल)
३. अनुसुचित जाती (SC) – १३ टक्के
४. अनुसुचित जमाती (ST) – ७ टक्के
५. विमुक्त जाती (VJ) – ३ टक्के
६. भटक्या जमाती (NT B) – २.५
७. भटक्या जमाती (NT C) – ३.५
८. भटक्या जमाती (NT D) – २.५
९. विशेष मागास प्रवर्ग (SBC) – २ टक्के