मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – तुम्ही जर ऑनलाईन औषधे खरेदी करत आहात तर यासंदर्भात माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या माहितीनुसार, आता ऑनलाईन औषध खरेदी करताना व्हाट्सअपवरुन डॉटरांचे प्रिस्क्रिप्शन पाठवणे बंधनकारक आहे. तसेच ऑनलाईन औषधविक्री करणाऱ्या कंपन्यांनीही केंद्र सरकारच्या ई – पोर्टल वर नोंदणी करणे गरजेचे आहे.
ऑनलाईन औषध विक्री वेबसाईट्स वर अनेक कंपन्यांची औषधे सर्रासपणे विकली जातात. साध्या आजरांपासून गंभीर आजरांपर्यंत सगळ्या औषधांची विक्री केली जाते. अगदी सगळे नियम धाब्यावर बांधून गर्भपात, तसेच इतर अनेक औषधांची विक्री करतात. हा सर्व प्रकार उघडकीस आणणारी जनहित याचिका न्यायालयात सादर करण्यात आली आहे.
मुख्य न्यायाधीश प्रदीप नंद्राजोग आणि न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे या संबंधित सुनावणी झाली. कोणतीही मूलभूत तपासणी न करता, कोणाचीही परवानगी न घेता औषधांची ऑनलाईन विक्री केली जाते. ‘एच’ आणि ‘एक्स’ गटांतील औषधें, गंभीर आजारांवरील तसेच गर्भपातासंदर्भातील औषधें खरेदी करताना किंवा विक्री करताना वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन आणि तपासणी अनिवार्य असावी, अशी मागणी या याचिकेद्व्यारे करण्यात आली.
केंद्र सरकारनेदेखील याची दखल घेत, ई – फार्मसी पोर्ट्ल अद्ययावत केले आहे. त्यानुसार सर्व ऑनलाईन कंपन्यांना ई -पोर्टल वर सर्व औषधांची नोंदणी करणे बंधनकारक आहे. यानुसार सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या असून त्याचा अंतिम मसुदा २८ ऑगस्ट पर्यंत तयार होईल, असे केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात आले.
तसेच कोणत्याही औषधाची विक्री करताना ग्राहकाकडून त्या संबंधीचे प्रिस्क्रिप्शन व्हाट्सअपद्वारे उपलोड करणे बंधनकारक आहे. त्यामुळे प्रिस्क्रिप्शन शिवाय औषध विक्री केली जाणार नाही. असे सर्व कंपन्यांनी मंजूर केले. याबाबत खंडपीठाने देखील समाधान व्यक्त केले आहे.